अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या “समाजभूषण” पुस्तकास राज्यस्तरीय, तापी साहित्य पुरस्कार जाहीर झाला असून तो ५ जून रोजी गोव्यात होणाऱ्या अखिल भारतीय शिव साहित्य संमेलनात देण्यात येणार आहे.
“समाजभूषण” पुस्तकास मिळालेला दुसरा पुरस्कार म्हणजे “शब्दप्रतिभा साहित्य रत्न पुरस्कार” होय.
हा पुरस्कार नुकताच पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या शानदार कार्यक्रमात “समाजभूषण”च्या
सहलेखिका रश्मी हेडे यांनी पुणे महानगपालिकेच्या
स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन ईटकर, कासार समाज मध्यवर्तीचे युवा अध्यक्ष प्रकाश दादा तवटे, जेष्ठ कवयत्री ज्योत्स्ना चांदगुडे, कार्यक्रमाच्या आयोजक स्मिता धारूरकर आदी मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला.
पुस्तक परिचय
ज्या व्यक्ती शिकतील, नवे काही करण्याचे धाडस करतील, त्या नक्कीच यशस्वी होतील, असा यशाचा मूलमंत्र सांगणारे हे श्री देवेंद्र भुजबळ लिखित “समाजभूषण” पुस्तक मुंबई येथील प्रसिद्ध भरारी प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. उद्योग व मराठी भाषा मंत्री श्री सुभाष देसाई यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन मंत्रालयात २७ सप्टेंबर २०२१ रोजी झाले. त्या नंतर अनेक मान्यवरांच्या हस्ते विभागीय प्रकाशन समारंभ झाले. या प्रेरणादायी पुस्तकाची १ हजार प्रतींची पहिली आवृत्ती संपत आली आहे.
या पुस्तकात कासार समाजातील ३५ स्त्री पुरुषांच्या यशोगाथा आहेत. प्रत्येकाची यशाची वाटचाल जरी वेगळी असली तरी त्यांच्यातील कष्ट करण्याची तयारी, जिद्द, चिकाटी, प्रयत्नवादी व सकारात्मक विचारसरणी, अभ्यासू, धाडसी वृत्ती हे गुण समान आहेत.
त्यांचा जीवन प्रवास, आलेले चढ उतार, यश अपयशाच्या गोष्टी व त्यावर हिंमतीने केलेली मात खूप काही शिकवून जाते. न थांबता, न डगमगता प्रत्येक परिस्थितीचा सामना केला तर यश निश्चितच प्राप्त होते हे या पुस्तकात अतिशय सुंदर व सोप्या शब्दात मांडले आहे.
समाजभूषण पुस्तकापासून प्रेरणा घेऊन इतरही काही व्यक्ती, समाज अशा स्वरूपाची पुस्तके काढण्याच्या मार्गावर आहेत यातच समाजभूषण चे सार्थक आहे.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800.
समाजभूषण हे पुस्तक अतिशय वाचनीय सुंदर आहेच.
दोन नामांकीत पुरस्कार मिळाल्याबद्दल मनापासून अभिनंदन!
संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन !
लेखक श्री.देवेंद्र भुजबळ सरांच्या सहज समजून येणाऱ्या लेखनातून मिळणारा प्रेरणादायी यशाचा मूलमंत्र, उद्याच्या व आजच्या पिढीला खूप काही देणारा आहे. आज ‘समाजभूषण’ पुस्तकाला, मिळालेला दुसरा पुरस्कार यशाच्या शिखरावर आहे.
अभिनंदन ! भुजबळ सर.
सौ.वर्षा भाबल.
🌹पूर्ण सर्व team चे अभिनंदन 🌹
अशोक साबळे
अंबरनाथ