समुद्र अनंत, किनारा शांत
किनारा त्याच्या प्रेमाचा अंत
जीवन तरंग, अंतर रंग
संसार संत, अनामिक खंत
मनाच्या पार स्वप्नांच्या नावा
हळू हेलकावा, केवढा आकांत
लाटांना ओढ, किनाऱ्यास ताण
किनारा भ्रांत, समुद्र शांत.

— रचना : नयना निगळ्ये. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800