आपापल्या देशाच्या समृद्ध परंपरेचा प्रचार व प्रसार करण्याची उत्तम संधी रोटरी क्लब तर्फे रोटरी युथ एक्सचेंज प्रोग्राममार्फत युवकांना मिळत असते.
अत्यंत प्रतिष्ठित आणि खूप स्पर्धा असलेल्या
या कार्यक्रमात पुणे येथील १६ वर्षीय समृद्धी नितीन विभुते हिची निवड झाली असुन ती येत्या बुधवारी ब्राझील साठी रवाना होत आहे.
या तिच्या निवडीबद्दल रोटरी क्लब ऑफ पुणे, डेक्कन जिमखाना शाखेतर्फे रोटेरियन प्रेसिडेंट डॉ अमित आंद्रे
आणि सेक्रेटरी रोटेरियन डॉ उमेश फालक यांच्याहस्ते तिचा नुकताच शानदार सत्कार करण्यात आला. या वेळी रोटरी युथ एक्सचेंज इंबॉऊण्ड चेअर रोटेरियन सारिका रोडे व सर्व रोटरी मेम्बर उपस्थित होते.
रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या आर.वाय.इ डायरेक्टर रोटेरियन शोभा नहार यांच्या मार्गदर्शनाखाली, रोटरी क्लब पुणे डेक्कन जिमखान्याच्या युथ डायरेक्टर रोटेरियन सरिता गोएंका यांच्या प्रेरणेमुळे आणि काऊंसिलर रोटेरियन अनिता कौलगुड यांच्या सहकार्याने कु. समृद्धी ब्रझिलला निघाली आहे. डि.जी ईलेक्ट रोटेरियन मंजू फडके यांचे आशिर्वाद सदैव तिच्या पाठीशी आहेत
समृध्दी, ब्राझील मध्ये भारताची आणि रोटरी क्लब, डेक्कन जिमखाना, पुणे ची प्रतिनिधी म्हणून कार्यरत राहील.
परिचय
समृध्दी नुकतीच दहावी पास झाली आहे. लहानपणापासूनच ती आवडीने आई वडिल, रोटेरियन नितीन विभुते आणि सौ ज्योती नितीन विभूते-चाळसे यांच्यासोबत गेली १४ वर्षे रोटरी क्लब मध्ये येत असून नाटक, नृत्य आणि इतर विविध उपक्रमात हिरीरीने सहभागी होत आली आहे.
समृध्दीचे वडील रोटेरियन श्री नितीन सखाराम विभुते हे गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर असून सीसीटीव्ही, इलेक्ट्रिकल्स, वॉटर सप्लाय मध्ये डिजाइनिंग, इन्स्टॉलेशन, कमिशनिंग ची कामे करतात. आई रोटेरियन सौ ज्योती विभुते-चाळसे या त्यांना व्यवसायात पूर्ण मदत तर करीतच असतात शिवाय मसाले व बारा महिने चकली
उत्पादनचा व्यवसायही त्या करीत आहेत. त्या उत्तम गृहिणीही आहेत.
विशेष म्हणजे समृद्धी ही त्यांची एकुलती एक मुलगी असूनही तिची निवड झाल्यावर, इतके दूर तेही एका वर्षासाठी कशाला पाठवायचे असा विचार न करता, तिच्या भविष्याचा विचार करून तिच्या पालकांनी तिला ब्राझील देशामध्ये एक वर्षासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
श्री नितीन यांचे वडील सखाराम विभुते आणि आई सौ रेखा सखाराम विभुते हे दोघेही वारकरी संप्रदायामध्ये असून आजही या संदर्भातील जमेल तेवढे सर्व कार्य
भक्तीभावाने करतात. तर भाऊ श्री सचिन विभुते व सौ अरुंधती विभुते व त्यांची दोन मुलं, मुलगा अद्विक
व मुलगी दीविना हे अमेरिकेत स्थायिक आहेत.
समृध्दीच्या निवडीबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत असून आपल्या सर्वांतर्फे तिला हार्दिक शुभेच्छा.

– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
अभिनंदन समृध्दी तुला खुप शुभेच्छा 💐💐💐🌹🌹👍👍👍👍🙏🙏🙏👌👌