स्टॅचू ऑफ युनिटी
केवळ नाही पुतळा
मिळणे तो पहायला
असे आनंद सोहळा
उंचीअवाढव्य दिव्य
गवसणी घेआभाळा
त्याहूनि उंच सरदार
कर्तृत्व मान आगळा
कुंकुम टिळक शोभे
भारतमाता कपाळा
वल्लभजीचे कर्तृत्व
कळे अद्भुतझळाळा
उंच होई मान पाहता
सुख वाहते खळाळा
झुकते मान अलगद
नमन तया करायला
भारत रत्ना सन्मान
आदर्श असे सकळा
स्वातंत्र्य सेनानी भले
पोलादी पुरुष वेगळा
पटेलजी विचार पटेल
जगात पसरेलं दर्वळा
एकदा पाहता स्मारक
पुन्हा यालं कैक वेळा

— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
