समाजातील वंचित घटकांसाठी सर्वद ही सामाजिक संस्था काम करीत आहे. या संस्थेच्या कार्यावर आधारित विशेष लेख आपल्या पोर्टल वर प्रसिद्ध करण्यात आला आहे. अशा या सर्वद संस्थेने नुकतेच उचललेले पाऊल ३ लहानग्यांचे जीवन घडविण्यास कारणीभूत ठरणार आहे. सर्वद संस्थेच्या प्रमुख प्रा डॉ सुचिता पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
— संपादक
गोष्ट तशी लहान आणि मोठीही ! पालघर जिल्हयातील शिवाजीनगर सालवड येथील भाडेकरू श्री. धर्मपाल केसरी यांची पत्नी, तीन लहान मुलांना कायमची सोडून निघून गेली.
मोठी मुलगी महिमा १० वर्षाची, दुसरे दोघं जुळे कु. राणी ६ वर्ष, कु. राहुल ६ वर्ष. वडिल कंपनीत कामगार, तुटपुंजे पैसे, ३ मुले व स्वतः. यातच मोठ्या मुलीवर कोणीतरी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. कामावर जाणे, जेवण बनवणे, मुलांना सांभाळणे, अशक्यच.
त्यात या मुलांचे वडील व्यसनी. मुलांना शाळेत न पाठवता घरातच ठेवून ते घराला कुलूप लावून कामावर जाऊ लागले.
ही सर्व जीवघेणी परिस्थिती असह्य होऊन घरमालक श्री. निलेश राऊत यांनी सर्वद फाऊंडेशन शी संपर्क साधला.
त्यानुसार सर्वद संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक संस्था प्रत्यक्ष पाहिल्या. काही ठिकाणी ते फोनवर बोलले.
या सर्व प्रयत्नांना यश येऊन अखेर वसई येथील मराठा लाईफ फाउंडेशन या श्री. किसन लोखंडे सरांच्या संस्थेत मुलांना श्री. अमित हिरे आणि मानसी हिरे यांनी पाठवून दाखल केले.

सर्वद फाउंडेशन या मुलांशी कायम संपर्क ठेवणार आहेच. त्यामुळे ही तिन्ही मुले शिकतील, मोठी होतील, आपलं आयुष्य चांगलं जगतील अशी अपेक्षा आहे.
सर्वद संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते समाजात चांगले बदल घडविण्यासाठी, सुधारणा करण्यासाठी झटत आहेतच. आपण ही शक्य असल्यास त्यांच्या या उदात्त कार्यात जमेल तसा हातभार लावू या.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800