काय ढग
काय पाऊस
काय तो गारठा
सर्व OK मध्ये आहे ⛈️
काय खड्डे
काय पाणी
काय ते ऑरेंज अलर्ट
सर्व OK मध्ये आहे🚣🏻♂️
काय छत्री
काय रेनकोट
काय ती कांदा भजी
सर्व OK मध्ये आहे☕
काय धरण
काय शेती
काय ती जमिन
सर्व OK मध्ये आहे.🍁
काय विजा
काय आवाज
काय ती रेंज
सर्व OK मध्ये आहे☔
काय रिक्षा
काय मर्सिडीज
काय ते गतिरोधक
सर्व OK मध्ये आहे.🚦
काय अत्याचार
काय सत्कार
काय तो वाढदिवस
सर्व OK मध्ये आहे.🎂
काय ऑनलाईन
काय ऑफलाईन
काय ते रिझल्ट
सर्व OK मध्ये आहे.✍️
काय शिक्षण
काय नोकरी
काय ती भाववाढ
सर्व OK मध्ये आहे.👨👩👧👦
काय बातमी
काय मिडिया
काय तो करोना
सर्व OK मध्ये आहे.📰
काय धबधबा
काय सेल्फी
काय ती मस्ती
सर्व OK मध्ये आहे.📱
काय राजकारण
काय समाजकारण
काय ते कार्यकर्ते
सर्व OK मध्ये आहे.📺
– रचना : विलास देवळेकर 🤫
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
🌹खूप सुंदर आणि मार्मिक मुद्दा कवितेतून मांडला आहे 🌹
🌹धन्यवाद सर 🌹
मस्त ok आहे कविता
विलास देवळेकर सराची, उत्कृष्ट कविता आहे।
ही सत्य परिस्थिती ला योग्य आहे।
देवळेकर सर छान रचना अर्थातच 0 K मध्येच आहे .