Wednesday, June 18, 2025
Homeलेखसहज सुचलं म्हणुन : 11

सहज सुचलं म्हणुन : 11

चावडी …..
चावडी हा शब्द समोर आला की आपल्याला एखादं गाव डोळ्यासमोर येतं. आणि जाता येता वेळ असेल तर, आज बाजूला काय घडतय‌ ही जाणण्याची जागा, गावातली. शिवाय दवंडी पण इथच. थोडक्यात काय. आपल्या अवतीभोवतीचे च गूगल स्थान म्हणल्यास चालू शकेल, आजच्या भाषेत !

दिल्लीला आमची गेटेड कॉलनी आहे. १९८२ ला झालेल्या asiad, आशियाई खेळां च्या वेळची. इंग्लिश नाव. Asian games village. अगदी नावाला शोभणारं खेडं. त्या वेळेला बांधलेल्या तिन मजली, दोन मजली वास्तु आणि गुळगुळीत डांबरी रस्ता सोडला तर, मोठ मोठाले अन जुने वृक्षा मध्ये, त्यांना धक्का न लावता केलेले बांधकाम.

दिल्ली सारख्या महानगरात, आता मध्यभागी आलेले आणि आपली खेडं ही ओळख सर्वार्थाने जपलेली. उच्च पदस्थ व्यक्ती चे निवांत, निसर्ग रम्य निवास व्यवस्था. यामुळे काही जणांना सर्वंट क्वार्टर्स पण असतात.

ईथे एक वेगळेपणा म्हणजे, सर्वंट क्वार्टरमध्ये राहिला येणे शक्य होते कुटुंबातील स्री मुळे. बाई मुळे. ..women empowerment ? ,😂
ती स्त्री ज्या घरामुळे या क्वार्टर मध्ये राहिला येते, त्या घरातील दोन काम तिला मिळालेले असतात. त्या ‌बदल्यात तिने करायची आणि त्या शिवाय जी काम करेल त्याचे तिला अतिरिक्त पैसे मिळतात. या
बदल्यात क्वार्टर चे भाडं नाही द्यावे लागत. नवऱ्याला सुद्धा कुठे कार wash चे काम, तर कुठे ड्रायव्हर म्हणून काम मिळून जाते. ज्यांनी क्वार्टर रिकामं ठेवलं असेल त्या घराची काही कामे मिळतात. एकूणच दिल्ली सारख्या ठिकाणी आरामात उदर निर्वाह होतो. कारण दक्षिण दिल्ली मध्ये भल्या भल्याना घर भाड्याने घेणं स्वप्नात सुद्धा येत नाही तिथे, एक congested असला तरी आसरा मिळतो. शिवाय त्यांच्या मुलांना सुरक्षित, चांगलं आयुष्य मिळतं.

आमच्या इथल्या resident welfate executive committee नी ह्या मुलांना तायकांडो शिकवण्यासाठी एक प्रशिक्षक पण नेमला आहे. ह्या बायकांना आमच्या इथल्या उच्च शिक्षित, सधन स्रिया समाजसेवा म्हणुन, आठवड्यातून दोन दिवस शिवण आणि बाकी गोष्टी शिकवतात.

अशाच माझ्या एका मैत्रिणीच्या क्वार्टर मध्ये एक जोडप राहतं. दोन मुलं, एक मुलगी. २० वर्षांत सगळ्यांची लग्न झाली. ते आपल्या आपल्या जोडीदारासोबत दुसरीकडे राहतात. हे जोडपे गेले तीस वर्ष त्यांची मुलं खूप लहान होती तेंव्हापासून येथे राहत आहेत.
त्यांनी आमच्या बॅक यार्ड ला इस्त्री चे दुकान लावलय. सकाळची दोन घरची लागलेली कामे झाली की त्या इस्त्री वाल्याची बायको सुद्धा त्याला जॉईन होते.

दोघं भारी गप्पिष्ट. इस्त्री चे कपडे गोळा करण्याच्या निमित्ताने कॉलनी भर फिरणं होते आणि परिसरातील सगळी कडची खबरबात पण घेतली जाते. चांभार चौकश्या खूप. कुठे बाई सुटली, कोणाला ड्रायव्हर म्हणून हवाय ह्याची सगळी इत्यंभूत माहिती त्यांच्याकडे असते. त्यामुळे security गार्ड, ड्रायव्हर, कामवाल्या बायका, स्वीपर, कचरा गोळा करायला येणारा, कबाडी वाला…. सगळे तिथे येतात. कधी फुरसत म्हणून आणि नंतर सवय झाली म्हणून. आणि मग त्यांच्या मोदी सरकार, केजरीवाल सरकार पासुन, अमेरिका, रशिया युक्रेन पासून, कलियुग, कर्ता कर्म पर्यंत विविध विषयांवर चर्चा रंगतात .
राजकारणी लोकांनी कसं राज्य करायला हवं. यावर त्यांची चर्चा ऐकावी असे वाटते. सगळं ज्ञान आणि ज्ञानेश फक्त इथेच असावेत. राजकारण्यांनी ह्यांच्या कडूनच सल्ला घ्यायला हवा.

ह्या आधुनिक चावडी वरच्या गप्पा ऐकल्यावर लहानपणी अगदी छोट्या गावात राहत असताना, वडाच्या पारावर आजोबा लोकांच्या चर्चा शाळेत जाताना कानावर पडलेल्या, त्या पंचक्रोशीत ल्या असायच्या. आता आपण म्हणतो ना, जग एक ग्लोबल विलेज झालंय, तर त्यात ल्‌या डिजीटल माध्यमामुळे याना सर्व टीव्ही आणि माेबाई ल स्क्रीनवर दिसतं आणि समांतर panelist आणि श्रोते पण उपलब्ध असतात आणि live प्रत्यक्षात …तुमच्या स्कीम मध्ये, बगीचा/गार्डन असेल तर झाडाखाली वा बेंचावर पण अशीच चावडी असेल आणि आजुबाजुचा विषय घेऊन चावडी भरत असेल.

आमच्या दिल्ली मुळे विषय तसे असतील. पण खरंच इतक्या वर्षानंतर वाटते, आजही काहीच फरक नाही, कारण मनुष्यस्वभाव! जिज्ञासा की नाक खुपशेपणा ?

क्षमा प्रफुल

– लेखन : क्षमा प्रफुल. नवी दिल्ली
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. दिल्लीत वसलेल्या एका खेड्याचा इतिहास माहितीपूर्ण. या निमित्ताने तिथे होणा- या सर्व प्रकाराच्या व्यवहारांची माहिती नव्यानेच समजली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments