Wednesday, February 5, 2025
HomeUncategorizedसहज सुचलं म्हणून ( 4 )

सहज सुचलं म्हणून ( 4 )

अशी थंडी सुरेख बाई…
भैय्या, इसको मुझे इसी डिझाईन से बनाना है. वो कैसे करेंगे?”
“मॅडम जी, आप जैसे बोल रहे हो. वैसे नही बन पायेगा”
“देखो तो, कही ऍडजेस्ट होता है क्या ?
“नही, नही हो पायेगा”
अरे ये जो डिझाईन था. वो मुझे सामने चाहिये था. ठीक है, नही हो रहा है तो, आप जैसा है वैसा कर दो.
हे संवाद होते आमचां दिल्लीतला टेलर आणि माझी मैत्रीण आरती मधला. आणि म्हणुन हिंदीतुन.

टेलरला ती कुर्त्याचं डिझाईन समजावून सांगत होती. पण काही केल्या त्याला ते अड्जस्ट करता येत नव्हतं. तिच्याकडे एक शाल होती. त्याचा तिला कुर्ता बनवायचा होता. त्या शालीवर बॉर्डर होती आणि कुइरीचे डिझाईन होते दोन ठिकाणी. ते कुइरीचे डिझाईन, या शालीच्या बॉर्डर बरोबर तिला समोर घ्यायचे होते. त्याला काही ते जमत नव्हतं. मग मी त्याला समजावून सांगितलं, की कशा पद्धतीने त्या कुर्त्याचं ड्राफ्टिंग करायला हव. त्याला लगेच समजलं आणि तो म्हणाला, मी करून देतो. आणि शालीचा खूप सुंदर कुर्ता तयार झाला.

माझं फॅशन डिझायनिंग झालेलं असल्यामुळे आणि मी बरीच वर्ष बुटीक चालवुन अनुभव घेतला असल्यामुळे, मला ड्राफ्टिंग चटकन समजवता आलं.
शालीचा कुर्ता बनवण्याची ही भन्नाट आयडिया मात्र आरतीचीच.
तीच पाहून अर्थातच माझा सुद्धा कुर्ता बनलाच. सोडायचं कशाला ! तर अशा या ज्या शाली गोळा होत जातात, त्याचं कारण अर्थातच दिल्लीतील थंडी !

पूर्वी ऐकलं होतं की दिल्लीकडे विंटर कलेक्शन वेगळं असतं. बायका साड्यांवर मॅचिंग शाली घेतात. मॅचिंग स्वेटर्स घालतात. ओवर कोट्स कॅरी करतात. हे सगळं मजेशीरच वाटायचं. असं वाटायचं भारीच बाई हौस ! पण इथे आल्यावर, इथली थंडी अनुभवल्यावर मात्र लक्षात आलं की हौशी बरोबर या सगळ्याची गरज नितांत आहे. ब्लेझर घालणं पुरुषांना इथे कंपल्सरी. घालावाच लागतो

महाराष्ट्रात आम्ही सूटबूट लग्नातच घातलेले पाहिले. अगदी मे महिन्याच्या उन्हाळ्यात सुद्धा. गर्मीच्या धारेत. घामाच्या धारेत. 45 डिग्री मध्ये नागपूर मध्ये लग्नात सूट घातलेला नवरदेवाचे हाल पाहिलेत. पण इथे सायकलवर जाणारा सुद्धा सूट बुटात जातो. कारण आत थर्मल आणि ब्लेझर इथल्या थंडीला तोंड द्यायला आवश्यक असतं.

हवेत गारवा जाणवायला लागल्यावर, ती एक प्रोसिजरच सुरू होते, सगळ्यांच्या घरामध्ये. माळ्यावरनं मोठ्या मोठ्या बॅग काढल्या जातात. सगळे थंडीचे कपडे बॅगमधून काढायचे. कारण जेव्हा थोडं फार ऊन असतं. त्या उन्हात थोडसं ऊन दाखवून, ते वापरासाठी जागा करायची कपाटांमध्ये.
इथलं ब्लॅंकेट खूप जड आणि खूप गरम असतात. विंटर कलेक्शन मध्ये थर्मल्स, सॉक्स वेगवेगळे स्वेटर्स म्हणजे कमी जास्त थंडी त्याप्रमाणे खूप थंडी पडायला लागल्यावर जॅकेट्स, ओवर कोट्स. मग सुरू होतं हिटरची तपासणी. व्यवस्थित चालू आहे की नाही, ते चेक करणे. नवीन ऑर्डर करणे.

एका विशिष्ट काळात घरात किंवा ऑफिसमध्ये हीटर सुद्धा मस्ट होऊन जातात. एक, दोन आणि तीन filament चे पण असतात. ४०० watt एकाच. आणि मग आपल्या कडे डेझर्ट कुलर मुळे जसे विजेचे बिल वाढतात तसे इकडे हिटर मुळे.
आणि विंटर कलेक्शन बरोबरही काही समर कलेक्शन आणि साड्या हे सगळं बरोबरीने लागतच. कारण फंक्शन्स असतात. वेगवेगळे साहित्य, कला, गायन प्रकाशन तत्सम कार्यक्रम असतात, लग्नकार्य असतात. मग या सगळ्याची गरज असतेच. त्यामुळे रूम चे गोडाऊन होतं. कपडे कुठे आणि कसे ठेवावेत, याची नुसती तारांबळ उडते.

प्रत्येक हिवाळ्यामध्ये मागच्या वेळेपेक्षा थंडी थोडी जास्तच जाणवते आणि मग शॉपिंग केलं जातं. कारण थंडी मागच्या पेक्षा जास्त जाणवते आणि कलेक्शन मध्ये वाढ होते.
थंडी असते त्यामुळे खाण्याची चंगळ असते. सरसो का साग, मकई की रोटी, मेथीचे पराठे, मुळीचे पराठे वेगवेगळ्या भाज्या, पनीरच तर पिक’च इथे असतं. गाजर का हलवा, मुंग का हलवा, गुलाबजाम यांची तर नुसती रेलचेल असते.
हिवाळा भर, कपड्यांवर कपडे, घातले जातात. आधी थर्मल, मग त्यावर ड्रेस एखादा, मग त्यावर स्वेटर मग एखादा जॅकेट किंवा ओव्हरकोट. सुरुवातीला असं वाटतं खूप कपडे आहेत. त्यामुळे आपण असे जाड जाड दिसतोय. पण पुढे कपड्यांच्या लेयर कमी होत गेल्या की हळूहळू लक्षात येतं की खाण्याच्या चंगळीने तेवढेच वजन वाढलाय जेवढे एवढ्या सगळ्या कपड्यांनी वाढवलं होतं.
तरी आम्ही, पाउस, एखाद वेळेला गारा, क्वचित बर्फ पाडणार्या कडाक्याच्या थंडीचे दिवस सुद्धा एन्जॉय करतो.

हिवाळ्याच्या दिवसात थंडी वाढते, अंगावर कपडे वाढतात, कपाटातले कपडे वाढतात, खाण्याचे पदार्थ वाढतात, वजन वाढतं.
एकूणच काय सगळच वाढीस लागत आणि वाढलेलं वजन कमी करेपर्यंत पुन्हा थंडीचे दिवस आलेले असत्तात.
अशी थंडी सुरेख बाई, दिल्लीतच अनुभवावी….

क्षमा प्रफुल

– लेखन : क्षमा प्रफुल. नवी दिल्ली
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी