Friday, November 22, 2024
Homeसाहित्यसांग सांग आई...

सांग सांग आई…

“मुले ही देवाघरची फुले” असं म्हटलं आहे. खरंच लहानपणी मुलं किती निष्पाप, गोड असतात. त्यांच बालविश्व वेगळंच असतं.
स्वतःच्या घरामध्ये बाळाचं आगमन झालं, त्याची इवली इवली पावलं अंगणामध्ये दुडदुडायला लागली, की आईचं हृदय कसं आनंदानं उचंबळून येतं. ती भारावून जाते. अशावेळी आईच्या मनात ज्या प्रेमळ भावना जन्म घेतात, अशा भावनांचे चित्रण मी माझ्या बालकवितांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करते.

मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, त्यांना अवती-भवतीचं जग कळावं, आयुष्यभर आनंदी, सुखाने राहावं असं प्रत्येक आईबाबांना वाटतं असतं. लहानपणापासून झालेले चांगले संस्कार निश्चितच चांगली जडण-घडण करतात.

खरं तर बालमनावर चांगला संस्कार करण्याचं काम बाल साहित्य करत असतं. मोठ्यांसाठीं कविता, लेख, गोष्टी लिहीण हे एकवेळ सोपं असतं. परंतु लहान मुलांसाठी लिहिणे म्हणजे, छोट्यांच्या भाषेत मोठा आशय मांडणे खूप कठीण असतं. म्हणून तर मला महाराष्ट्राचे थोर साहित्यिक ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कविवर्य श्री कुसुमाग्रज यांचे आशिर्वाद लाभले.

ते म्हणजे “मुलांना आवडणाऱ्या विषयांवर आणि त्यांना समजेल अशा भाषेत आपण या कविता लिहील्या आहेत, त्या बालवाचकांना आवडतील असा मला विश्वास वाटतो. पुस्तकासाठी शुभेच्छा”
– वि.वा.शिरवाडकर

कविवर्य कुसुमाग्रजांचा आशिर्वाद म्हणजे जणू मला साक्षात सरस्वतीचाच आशिर्वाद लाभला. हे मी माझं भाग्यच समजते. या आशिर्वादातूनच बालवाचकांसाठी “संजलची दंगल” आणि “सवंगडी” या बालकाव्य संग्रहाची निर्मिती झाली.

आता यांत्रिक युगात वाचन पद्धती कमी झाली. मोबाईल, टी.व्ही.आणि काॕम्प्युटर यांनी मुलांना जणू विळखा घातला आहे. म्हणूनच माझ्या बालकविता मी बालगीतांच्या स्वरूपात मुलांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या बालगीतांमध्ये आधुनिक  (अल्ट्रा माॕर्डन) जगाच्या कुटुंबातील मुलांच्या समस्या अतिशय हळुवारपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

बाळ जन्माला आल्यानंतर त्याच खेळणं, त्याच रडणं, पाळणाघरात ठेवल्या नंतर त्याच वागणं, विचार करणं, या सर्व मुलांच्या मनातील भावना मी माझ्या बालगीतातून मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

लहान मुले थोडी मोठी, समझदार झाली, शाळेत जावू लागली की त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. पण डोक्यात आलेले हे प्रश्न विचारणार कोणाला.? साहजिकच मग ही छोटी मुले आपल्या आईला एक-एक प्रश्न विचारून भंडावून सोडतात. आपल्या समोर सादर करत आहे असंच एक बालगीत.
“सांग सांग आई…” हे गीत आपण पुढील लिंक वर पाहू शकता…..

– लेखन : सौ.सुरेखा गावंडे
– संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. सुरेखाताई प्रथम तुमचे मनापासून अभिनंदन!आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

    सांग सांग आई खूपच छान.
    मला संगीतही आवडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments