निळा अथांग सागर
त्याच्या नागमोडी लाटा
सय येता मन धावे
जाई कोकणच्या वाटा
निळाशार त्याचा रंग
वाटे नेत्री साठवावा
धीर गंभीर तो नाद
पुन्हा कानात घुमावा
मस्त भिजावे यथेच्छ
घ्याव्या अंगावरी लाटा
सूर्य अस्ताच्या वेळेस
रम्य निरखाव्या छटा
वाटे रुपेरी वाळूत
वाडा सुंदर बांधावा
सैर नौकेची करुनी
मेवा कोकणचा खावा
कोकणचा हा किनारा
शान ही महाराष्ट्राची
येथे माणसे मधूर
गोडी वाणीस आंब्याची

– रचना : सायली कुलकर्णी. गुजरात
खूप छान कविता.
कोंकणात गेल्यासारखे वाटले.
कोकण भूमीचे वास्तव व बारकावे सुंदर रितीने दाखवणारी सुंदर काव्य रचना
छान