देवा बामनाच्या साक्षीन ,
लग्नगाठ बांधलव आयुष्याची ।
थोरा मोटयांच्या आशीर्वादान ,
राजा रानीच्या संसाराची ॥
साटी ईली नि निवृत्त झालव ,
रितो दिवस सरता सरा नाय ।
एकमेकांच्या सहवासात मिसाळलव ,
आदाराची काटी उतारता वय ॥
अचानक राजा शिक पडलो ,
धावपळीत रानी गेली गांगरून ।
भारच्या जगात अवगड पल्लो ,
सावरून तेका सुकरूप आणल्यान ॥
निश्चय तेनी मनात केल्यान ,
भ्रमणध्वनी तिका घितल्यान ।
बँकेचा पुस्ताक दाकवन ठेवल्यान ,
बिला भरुक तिकाच लावल्यान ॥
विमा हाफीस लगेच गाठल्यान ,
वारस तपासनित बदल केल्यान ।
हिशेब बेरीज तिका दाकवल्यान ,
मृत्यूपत्र वारीस तिकाच ठेवल्यान ॥
राजाचा वागना कळत होता ,
निमूट तिनी शिकून घितल्यान ।
समाधान चेऱ्यार फुलत होता ,
सुखाचे दिवस मांडून ठेवल्यान ॥
आजाराचा ढोंग राणीन घितल्यान ,
सगळी अन्नपूर्णा तेच्यार सोपवल्यान ।
अळनी वरान पचकी चाय ,
कौतुक करीत परत मागल्यान ॥
ती रमली तेच्या व्यवारी कामात ,
तो गुतलो अन्नपूर्णाच्या ताटात ।
जीवन दोर तुटनार कोनाचीही ,
छापा की काटा देवाच्या मनात ॥
दोगवानचा मन खायत होता ,
तिच्या जान्यान एकटो पडात ।
तेच्या जान्यान भकास जीवान ,
काळजेन काळीज तुटत होता ॥
देवाकडे मागना याकच होता ,
हातात हात असोच ऱ्हवान दे ।
दोगवानची अरती सोबतिन जाव दे ,
सात जन्म आयुष्य पावला आता ॥

– रचना : सौ. वर्षा महेंद्र भाबल
– संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
वर्षा,खूप छान मालवणी कविता,आयुष्याच्या या वळणावर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुख ,समृद्धी ,समाधान यांपेक्षा शांती आणि आपुलकीची गरज असते,त्यात सहचारिणीचा मोठा सहभाग असतो,तिच्या शिवाय जगणे अवघड आहे.🙏🙏🙏🙏🌹🌹🌹