नवी मुंबईतील सानपाडा जेष्ठ नागरिक संघ हा एक आदर्श जेष्ठ नागरिक संघ म्हणून ओळखला जातो. हा संघ केवळ सदस्यांसाठीच नाही तर सर्व समाजाच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवित असतो.
एक ऑक्टोंबर या जागतिक जेष्ठ नागरिक संघ दिनाच्या निमित्ताने नवी मुंबई महानगरपालिकेने जेष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये सानपाडा जेष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी ११ पुरस्कार मिळवून संघाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. शिवाय उत्कृष्ठ संघाचे प्रथम पारितोषिक देखील या संघाने मिळविले आहे.
या पुरस्काराचे वितरण माजीमंत्री श्री गणेश नाईक व नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्याहस्ते नुकतेच विष्णूदास भावे नाटयगृहात एका शानदार सभारंभात प्रदान करण्यात आले.
संघाच्या सदस्यांनी विविध स्पर्धामध्ये मिळवलेले पुरुस्कार पुढील प्रमाणे आहेत…
१) कॅरम महिला : १. श्रीमती शालन देशमुख – प्रथम क्रमांक
२. श्रीमती विजया सु हेब्बाळकर – दुसरा क्रमांक
२) बुद्धिबळ : श्री रमेश मोहिते – प्रथम क्रमांक.
३) एकपायी अभिनय : १. श्री चंद्रकांत धोंडु शिंदे – प्रथम क्रमांक.
२. श्री राम कांजरोळकर – तृतीय क्रमांक
४) काव्यवाचन : १. डॉ. विजया गोसावी – प्रथम क्रमांक.
२. श्री राम काजरोळकर – द्वितीय क्रमांक.
५) हास्य स्पर्धा : – श्री जगदिश एकावडे – द्वितीय क्रमांक.
६) टेलिफोन स्पर्धा : श्री प्रशांत मोकाशी – दुसरा क्रमांक.
७) पत्रलेखन : १. श्री उत्तम माने – प्रथम क्रमांक.
२. श्री मारूती कदम – द्वितीय क्रमांक
या पुरस्कारांचे स्वरूप —
प्रथम क्रमांक – रू ३०००/ रोख रक्कम + स्मूतीचिन्ह + प्रमाणपत्र,
द्वितीय क्रमांक – रू २०००/ रोख रक्कम + स्मूतीचिन्ह + प्रमाणपत्र,
तृतीय क्रमांक – रू १०००/रोख रक्कम + स्मूतीचिन्ह + प्रमाणपत्र असे आहे.
या पुरस्कारांमुळे संघाच्या सदस्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800