Tuesday, September 16, 2025
Homeबातम्या"सार्थक" प्रकाशित

“सार्थक” प्रकाशित

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी झालेल्या डॉ. लक्षराज सानप, यांच्या “सार्थक” या तरुणांना प्रेरणादायी ठरणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या हस्ते राजभवनात झाले.

यावेळी डॉ. अमोल लक्षराज सानप यांचा “कोविद् योद्धा” म्हणून राज्यपाल यांनी प्रशस्तीपत्र आणि गोल्डन ट्रॉफी देऊन सत्कार केला.

या प्रसंगी कौतूक करण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेता, भाऊ कदम य उपस्थित होते.

आपलं गाव सोडून मुंबईत आल्यावर लक्षराज यांनी प्रसंगी ताडदेव येथे फूटपाथ वर तसेच पावसाळ्यात, मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर झोपून दिवस काढले. अतिशय कष्टाने ते उच्च विद्याविभूषित झाले.

आकाशवाणी मुंबई केंद्रावर, मराठी वृत्त निवेदक, दूरदर्शनवर मुलाखतकार, क्षेत्रीय सतर्कता अधिकारी तसेच भारत सरकारच्या विविध पदांवर ही कार्य केले. फिल्म डिव्हीजन साठी मॉडेलिंग केले. चित्रपट आणि लघुपट यामध्ये अभिनय केला. सतत सकारात्मक विचारसरणीने, कुठलाही तरुण प्रतिकूल परिस्थिती वर मात करून, आकाशाला गवसणी घालू शकतो, अश्या आशयाचे है पुस्तक आहे.

देवेंद्र भुजबळ

– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. 🌹श्री. भुजबळ साहेब आपण एक प्रेरणास्थान आहात. 🌹
    Dr. अमोल यांचे कष्टाचे फळ त्यांना. मिळाले.
    आपल्यासारखं मार्गदर्शन असेल तर लोखडाचा परीस होणार हे निश्चित.
    🌹धन्यवाद साहेब 🌹

    अशोक साबळे
    Ex. Indian Navy

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments