Wednesday, March 12, 2025
Homeलेखसावरकर आणि मंगेशकर

सावरकर आणि मंगेशकर

लता मंगेशकर यांचे वडील, श्री दिनानाथ मंगेशकर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना नेहमी भेटत असत. सावरकर रत्नागिरी येथे स्थानबद्ध असताना त्यांच्या नाट्य प्रयोगांच्या निमित्ताने त्यांच्या भेटी होत असत.

वीर सावरकरांनी ‘संन्यस्त खड्ग’ नावाचे नाटक श्री दिनानाथ मंगेशकर यांच्या “बलवंत संगीत मंडळी” साठी लिहले होते. ज्याचा पहिला प्रयोग मुंबई येथे १८ सप्टेंबर १९३१ रोजी झाला होता ..लतादीदी तेव्हा फक्त दोन वर्षांच्या होत्या.
(संन्यस्त खड्ग -पहिला प्रयोग)

पुढे दिनानाथ जेव्हा रत्नागिरीला येत, तेव्हाही ते सावरकरांची भेट घेत ..एकदा तर दिनानाथ, लतादीदी व सावरकर एका हरिजन वस्तीमध्ये सहभोजनास एकत्र गेले होते, म्हणजे हे संस्कार मंगेशकर कुटुंबियांवर अगदी पहिल्यापासून होते असे दिसते.

पुढे सावरकर रत्नागिरीहून मुंबईत “सावरकर सदन” येथे राहावयास आले. मंगेशकर कुटुंबीय ही कालांतराने मुंबई येथेच स्थायिक झाले. तेव्हाही लतादीदी व त्यांची भावंड वारंवार सावरकरांच्या घरी जात असत. वीर सावरकरांना माईच्या (लतादीदी यांची आई) हातची खिचडी खूप आवडतं असे.

लता मंगेशकर या स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयावर बोलताना कायमच भावनिक होताना दिसतात. त्या सावरकरांना वडिलांच्या जागी मानत. पुर्ण मंगेशकर कुटुंबीय अक्षरशः सावरकरांचे भक्त होते व हे त्यांनी कधीही लपवून ठेवले नाही, किंबहुना हे नाते त्यांनी अभिमानाने मिरवले.

तो काळ काँग्रेस चा होता व सावरकरांसाठी प्रतिकूल असाच होता ..सावरकर व त्यांचे कुटुंबीय यांच्याशी आपले नाते आहे असे सांगणे हे सुध्दा वरच्या सत्ताधारी लोकांशी वैर ओढवून घेण्यासारखे होते ..तरीही मंगेशकर ठाम होते असे दिसते.

मग ते सावरकरांनी सावधगिरी ची सूचना देऊनही “ने मजसी ने” या गीताला हृदयनाथ मंगेशकर यांनी चाल देणे असो, किंवा लतादीदी, उषादीदी वा या सर्वांनी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरवाने उल्लेख करणे असो, मंगेशकर त्यावर ठाम होते .
यावरून असे दिसते,
१. स्वातंत्र्यवीर सावरकर हे प्रचंड प्रभावी व्यक्तिमत्त्व होते . चांगले व सच्चे लोक कायमच त्यांच्या संपर्कात राहणे पसंद करत ..म्हणजेच बाकी सारे काही आम्हाला गमवावे लागले तरी चालेल पण आम्ही सावरकर सोडणार नाही.

२. मंगेशकर कुटुंबियांना सावरकर कोणत्या कारणासाठी जगले व कसे जगले याची पक्की जाणीव होती, त्यामुळेच त्यांना सावरकर हवेसे व आदरणीय वाटत .

३. सावरकरांच्या संपर्कात आलेला प्रत्येक चांगल्या मनाचा व देशभक्त व्यक्ती सावरकरांचाच होऊन जात असे, हे मंगेशकर कुटुंबाच्या उदाहरणावरून लक्षात येते.

हे व्हिडिओ आता चांगलेच viral झाले आहेत, पण हे मी जे लिहिले त्याचा visual अनुभव घ्यायचा असेल तर नक्की बघा :-

लता जी, सावरकरांबद्दल बोलताना
https://youtu.be/G72DADnKXzY

हृदयनाथजी आपला अनुभव सांगताना
https://youtu.be/VEkm8M8XICM

भारताचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी नुकत्याच राज्यसभेतील भाषणात हृदयनाथ यांना कशी वागणूक मिळाली हे सांगताना
https://fb.watch/b2gzEPi_3C/

– लेखन : हेमंत सांबरे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. हृदयनाथ मंगेशकरांनी स्वा. सावरकरांच्या ने मजसी ने या कवितेला चाल दिल्याचा किस्सा ऐकला होताच.
    पण सावरकर आणि मंगेशकर कुटुंबीयांचे असलेले जिव्हाळ्याचे नाते या लेखातून जास्त स्पष्टपणे जाणवले.
    लेख उत्तमच.

    सायली कस्तुर
    संपादक ई साप्ताहिक साहित्य मंजिरी.
    पुणे

  2. मंगेशकर कुटुंबियांना सावरकर कोणत्या कारणासाठी व कसे जगले हे ठाऊक होते.
    या वाक्य रचनेतून फार मार्मिक उदभोदता समोर येते
    आणि तमाम महाराष्ट्रीय किंबहुना भारतीय जनतेला सावरकारांचे जीवन आणि त्याग कळलाच नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित
सौ.मिनल शशिकांत शिंदे, on चित्र भाषा संमेलन : अभिनव उपक्रम