अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, मुंबई प्रदेश अंतर्गत मध्य मुंबई विभाग आयोजित ४ थे सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय साहित्य संमेलन नुकतेच मुंबईत
जल्लोषात संपन्न झाले.
सुप्रसिद्ध लेखिका, कवयत्री हिरकणी राजश्री बोहरा यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन झाले.
संमेलनाचे उद्घाटन संस्थेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा शुभांगी काळभोर यांनी केले. विशेष अतिथी म्हणून संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री फुलचंद नागटिळक उपस्थित होते.
संमेलनाध्यक्षा बोहरा यांच्या मनोगतातून त्यांनी आजच्या काळातील स्त्रियांनी स्वावलंबी होऊन स्वसंरक्षण करावे असे आवाहन केले. स्त्री वरील अन्यायाविरुद्ध बंड पुकारून समाजात नव परिवर्तन घडवायला हवे असे मत ठामपणे आपल्या काव्यातून मांडले.
आपल्या कवितेवर कवीचे प्रेम असायला हवे. कविता साधी असली तरी समाजाचे अंतःकरण उलगडणारी असावी असे मत विशेष अतिथी श्री फुलचंद नागटिळक यांनी मांडले.
तर आजही एका विधवेला समाजात सन्मानाने स्थान मिळत नाही अशी खंत उद्घाटक शुभांगी ताईंनी मांडली.
मध्य मुंबई विभाग कार्यकारिणी सौ. शोभा गायकवाड (अध्यक्षा), श्री सुनील पवार (कार्याध्यक्ष), सौ. अंजली पाखलें (उपाध्यक्षा), सौ. सारिका चव्हाण (सरचिटणीस) यांच्या उत्तम आयोजन व नियोजनाचा प्रत्यय आला.
ठाणे जिल्हा अध्यक्षा सौ. अनिता गुजर व ठाणे विभागीय अध्यक्ष श्री बाळासाहेब तोरसकर यांनी
“स्त्री शिक्षण काळाची गरज” या विषयावर उत्तम परिसंवाद सादर केला.
संमेलनाला नागपूरचे जिल्हा उपाध्यक्ष श्री नामदेव राठोड, कल्याण डोंबिवली महानगर विभाग अध्यक्ष श्री नवनाथ ठाकूर, उत्तर मुंबई अध्यक्षा गीतांजली वाणी, नवी मुंबई अध्यक्षा जान्हवी कुंभारकर त्याचप्रमाणे विठ्ठल घाडी, अविनाश ठाकूर, मुग्धा कुंटे, हरिश्चंद्र दळवी, रतन याडकिकर, मजू वणावे, कांचन नेवे, भारत घेरे, राधिका बापट इत्यादी अनेक मान्यवर कवी उपस्थित होते.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800.
🌹छान उपक्रम 🌹
अशोक बी साबळे
Ex. Indian Navy
अंबरनाथ
अ.भा.म.सा.प.च्या मुंबई शाखेतर्फे आयोजित सावित्रीबाई फुले संमेलनाचा नेटका आढावा. या संमेलनातून महिलांच्या जीवनासंबंधी विविध विषयांवर चर्चा,कवितांचे सादरीकरण झाले हे अभिनंदनीय