Thursday, September 11, 2025
Homeयशकथासासू सून किचन

सासू सून किचन

नमस्कार,
वाचक हो.

केरळ दर्शन करून आपण माझ्या बागेत आलायत. पण आज जरा मैत्रिणीच्या स्वयंपाक घरात डोकावणार आहोत. खाद्य प्रेमींसाठी विविध पदार्थांची मेजवानी घेणार आहोत.

श्रावण महिना सुखावून गेला, भाद्रपद गौरी गणपतीच्या उत्सवाने चैतन्य देऊन गेला आता आश्विन नवरात्रीचा उत्साह घेवून येत आहे. देवीची स्थापना, पूजा, उपवास तनमन प्रफुल्लित करेल तोपर्यंत दिवाळीचेही वेध लागतील.

गणपतीसाठी विविध मोदक असो किंवा गौरीचा फराळ, नैवेद्य, महाप्रसाद असो. श्रावणातले उपवास नाहीतर नवरात्रीचे उपवास असो. येऊ पाहणाऱ्या दिवाळीसाठी सर्व तिखट गोड पदार्थांच्या फराळाचा संच (kit) किंवा विविध चॉकलेटचे प्रकार वा लोणची, चटण्या, मोरावळा असे दीर्घ काळ टिकणारे पदार्थ असो.. कोणत्याही सणाला, कार्यक्रमाला या वरील सर्व गोष्टी, पदार्थ एकत्र मिळायचे ठिकाण म्हणजे “सासू-सून किचन”.

सौ. उज्वला चंद्रकांत अग्निहोत्री आणि सौ. शुभांगी मंगेश अग्निहोत्री – मुंबई डोंबिवली पूर्व इथे राहणाऱ्या सासू सूनेने मिळून सुरु केलेला हा व्यवसाय आता नावारूपास आला आहे.

कचोरी, बटाटे वडे, दही वडा, कटलेट (बटाटा कच्ची केळी रताळे), साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी, बटाटा भाजी, राजगिरा भाकरी, आमटी, रताळे तिखट कीस, गोड रताळे काप, बटाटा कीस, बटाटे शिरा, रताळे गुलाबजाम, भगर भजी, बटाटा, साबुदाणा भजी, सुरळी वडी, भाजणी थालीपीठ, राजगिरा पुरी, रताळे खीर, शिंगाडा पीठ शिरा, शिंगाड्याची शेवई खीर, शिंगाडा शेवई चिवडा, राजगिरा शिरा, राजगिरा थालीपीठ, उपवास कढी, खजूर लाडू, सुखा मेवा लाडू, आप्पे, डोसा, पॅटिस, भगर (मिरची किंवा तिखटाची), आमसूल सार, तिखट रताळे कीस, बटाटा कीस तिखट, बटाटा रस्सा भाजी, केळ पाक…. याशिवाय उपवासाच्या पदार्थांची कोरडी पिठंही मिळतात.

हे तर फक्त उपवासाचे पदार्थ झाले. कल्पना करा फक्त उपवासाचे पदार्थच जर इतके असतील तर नाष्टा, जेवणात किती विविधता असेल ?
स्वच्छता आणि शुद्धता याची काळजी घेवून सर्व पदार्थ बनवले जातात हा !!
महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही वस्तू, पदार्थ पाठवले जातात पण त्याबरोबर देशाबाहेर इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलियालाही टिकणारे पदार्थ गिऱ्हाईक आवडीने स्वतः घेवून जातात.
नाष्टा, जेवण किंवा सणाच्या दिवशीही जे जे खास असेल ते सर्व पदार्थ ताजे बनवेलेले असतात.

समाधानी गिऱ्हाईकांच्या अभिप्रायवरूनच आपल्या बऱ्याच गोष्टी लक्षात येतात म्हणून पदार्थांची चव, प्रमाण, स्वछता आणि गुणवत्ता याबाबत कुणीही शंका बाळगत नाही. अन्नपूर्णेचा वरद हस्तच या जोडीवर आहे.

याशिवाय गणपती मध्ये, मार्गशीष महिन्यात किंवा माघी गणपतीला वापरली जाणारी गेजवस्त्र – कापसाची वेगवेगळी चाळीस प्रकारची वस्त्र, दिवाळीसाठी विशेष अभ्यंग स्नान संच – तेल, उटणे, साबण, अत्तर, रांगोळ्या, पणत्या आणि इतर सामान हे सर्व यांच्याकडे उपलब्ध होते.

सर्व वस्तू घरीच बनवलेल्या असतात म्हणून तर म्हंटले आहे – #फिकर नॉट – आहे ना सगळे एकाच ठिकाणी !

खरंच कौतुक वाटते या जोडीचे. सासूबाईंचा अनुभव आणि सुनेची कल्पकता एकमेकींना पूरक आहे. नोकरी करत कलाकार शुभांगी हा व्यवसाय समर्थपणे पेलते ते सासूबाईंच्या पाठिंब्यामुळे. जुन्या नव्याची घातलेली सांगड अस्तित्व निर्माण करण्यास किती फायद्याची ठरते याचे उत्तम उदाहरण आहे हे.

एकमेकींना साथ देणाऱ्या, समजून घेणाऱ्या अशा सासु सुना घरोघरी असतील तर घराचा स्वर्ग होण्यास वेळ लागणार नाही.

दुर्गादेवीचा उत्सव आरंभ होत असताना या उत्साही, सुगरण आणि कलाकार असलेल्या गृहलक्ष्मींचे कौतुक करताना फार आनंद होत आहे.

मनीषा पाटील

– लेखन : सौ. मनिषा दिपक पाटील. पालकाड, केरळ
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. Thank you very much for describing Sasu-Soon kitchen in very correct and relevant words. May the business of Sasu Soon’s kitchen which has really blessed from Annapurna flourish

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अमेरिकन भारतीयांनो “रजा” घ्या !
Shashikant Oak on व्यंग कथा
सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा
मितल सुहास वावेकर on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
जयश्री चौधरी मुंबई on व्यंग कथा
सचिन जगन्नाथ कांबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
नामदेव लक्ष्मण वनगुले तळा - सोनसडे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !