“युवक बिरादरी”च्या वतीने जाहीर झालेला “साहित्यश्री” पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक श्री. सुमेध रिसबूड – वडावला यांना नुकताच रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार त्यांना एबीपी माझा वाहिनीचे संपादक श्री राजीव खांडेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी न्यायमूर्ती श्री. सत्यरंजन धर्माधिकारी, खासदार श्री. कुमार केतकर, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळूकर आदी मान्यवर उपस्थित होते. १ लाख रुपये, सन्मानचिन्ह व गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
अल्प परिचय
कथा, कादंबरी, आत्मकथा अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारांवर पकड असलेल्या श्री. सुमेध रिसबूड – वडावाला यांनी ‘धर्मयुद्ध’, ‘पुस्तक उघडलं’ ‘बावन्नकशी’ हे कथासंग्रह, ‘तृष्णा’, ‘ब्रह्मकमळ’ या कादंबऱ्या ‘आई ती आईच’ आत्मकथनपर लेखन, ‘दोन चाके झपाटलेली’ हे प्रवासवर्णन अशा विविध साहित्य प्रकारात विपुल लेखन केले आहे. आजवर त्यांची सुमारे ३५ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
२०१३ साली खेड – रत्नागिरी येथे भरलेल्या एकदिवसीय ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते.

– लेखन : उद्धव रिसबूड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
