शकुंतला गोगटे
कथालेखनात आपले वेगळे असे व्यक्तिमत्व प्रगट करणाऱ्या सुधा नरवणे, ज्योत्स्ना देवधर, इंद्रायणी सावकार, शकुंतला गोगटे, शैलजा राजे इ. किती तरी नावे पुढे येतात. काहींच्या कथा जुन्या वळणाने तर काहींच्या कथांतून नवे नवे प्रयोग करण्याचे सामर्थ्य व्यक्त होत आहे.समाज जीवनातील वेगवेगळ्या स्तरांवर त्यांची कथा आपणाला नेते व त्या जीवनातील व्यथा बोलक्या करते.
कथालेखिका व कादंबरीकार सर्वोत्कृष्ट स्त्री लेखिका म्हणून ओळखल्या जाणा-या शकुंतला गोगटे यांचा जन्म १९३० रोजी झाला..
शकुंतला विष्णू गोगटे यांच्या ‘किती रंगला खेळ’, ‘चंदनाची उटी’, ‘कशाला उद्याची बात’ सुगंध, एकदाच, ते माझे घर, अनुबंध, आमचे संसार झालेच ना, चोर कप्पा, अबोली, अनुगूण, घुसमट, ‘झपूर्झा’, ‘सावलीचा चटका’, ‘मर्यादा’ इ. अनेक कादंब-या व कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत.
“जाणता-अजाणता”‘ या रौप्यमहोत्सवी कादंबरीत ‘एन्जॉयर्स क्लब’चे वर्णन येते तर १२ जुलैच्या रात्री पानशेत धरण फुटले, पुण्यात हाहाकार माजला होता.त्यातून पानशेतचा पूर व त्यानंतर हा विषय घेऊन श्री. ना. पेंडसे यांनी नाटक लिहिले तर शकुंतला गोगटे यांनी ‘पानशेतचा प्रलय’ नावाची सत्यकथा लिहिली.
शकुंतला गोगटे यांनी अनेक कादंबऱ्या, लघुकथा संग्रह असे विपुल लिखाण केले. त्यांचे बरेचसे लिखाण सामाजिक विषय डोळ्यांसमोर ठेवून केल्याचे जाणवते. त्यातही पांढरपेशा मध्यमवर्गाचे जीवन रंगवलेले दिसते.
बूमरँग, मर्यादा, सारीपाट, अभिसारिका, समांतर रेषा, त्याला हे कसं सांगू ?, सावलीचा चटका, माझं काय चुकलं, मी एक शून्य, दोघी, मना तुझा रंग कसा, झंकार, ही आणि त्यांनी लिहिलेली इतर पुस्तके वाचकांच्या पसंतीस पूर्णपणे उतरलेली आहेत. त्या “ सर्वोत्कृष्ट स्त्री लेखिका “ म्हणून ओळखल्या जात होत्या.
कथालेखिका व कादंबरीकार शकुंतला गोगटे यांचे ५ नोव्हेंबर १९९१ रोजी निधन झाले.
— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800