Friday, January 10, 2025
Homeसाहित्यसाहित्य तारका : ४०

साहित्य तारका : ४०

अंजली नरवणे

अनुवादित साहित्य ही स्वतंत्र कलाकृती असते. अर्थवाही भाषा, शैलीला जाणीवपूर्वक दिलेले चपखल मराठी वळण हेच या अनुवादाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. गुजराती व इंग्रजी साहित्य मराठीत अनुवादित करून मराठी साहित्य विश्वामध्ये मोलाची भर टाकणाऱ्या मराठी लेखिका अंजली नरवणे यांचा आज आपण परिचय करून घेऊ या.

अंजनी जयंत नरवणे यांचा जन्म १७ मे  १९३४ रोजी सातारा येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण वाई शहरातील द्रविड हायस्कूल, साताऱ्यातील अ न्यू इंग्लिश स्कूल येथे तर कॉलेज शिक्षण  पुण्याच्या फर्ग्युसन कॅालेजमध्ये झाले.
त्यांचे कॉलेज शिक्षण पूर्ण होण्याआधीच लग्न झाले. आणि त्यानंतर त्यांनी पुढे १५ वर्षांनी घरच्या घरीच अभ्यास करून परीक्षा दिली व शिवाजी विद्यापीठाची बी. ए. (ऑनर्स) ची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीचा रशियन भाषेचा डिप्लोमा केला.

अंजली नरवणे लग्नानंतर गुजरातला गेल्या व तेथे त्या ४५ वर्षे राहिल्या. त्यांनी गुजराती भाषेत प्रावीण्य मिळवून त्या गुजराती पुस्तकांची भाषांतरे करू लागल्या. त्यांनी अनेक  इंग्रजी व गुजराती पुस्तकांची मराठीत रूपांतरे केली आहेत.

अंजनी नरवणे यांनी १९७४ पासून दर्जेदार नियतकालिकांत लघुनिबंध, ललितलेख, लघुकथा, विनोदी लेख वगैरे लिहायला सुरुवात केली आणि १९८७ पासून त्यांची स्वतंत्र आणि गुजराती- इंग्रजीतून अनुवादित केलेली पुस्तके प्रकाशित होऊ लागली. “अकूपार” ही ध्रुव भट्ट या सिद्धहस्त गुजराती लेखिकाची चौथी कादंबरी सहजसोपं तरीही आशयघन लेखन हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य. प्रस्तुत कादंबरीत एका चित्रकाराच्या आत्मशोधाची कथा अतिशय उत्कटतेनं चितारली आहे तर
वर्षा अडालजा या गुजरातीतील कादंबरीकार. त्यांच्या ‘अणसार’ या कुष्ठरोग्यांच्या जीवनावरील कादंबरीचा अनुवाद अंजनी नरवणे यांनी फार चांगला केला आहे.

धृव भट्ट हे गुजराती साहित्य जगतातील प्रसिद्ध नाव. समुद्रान्तिके आणि तत्त्वमसि या त्यांच्या पहिल्या दोन कादंबर्‍यांना गुजरात साहित्य अकादमी तसेच तत्त्वमसिला केंद्रिय साहित्य अकादमी पुरस्कार मिळाले आहेत. अंजली नरवणे यांनी गुजराथी लेखक धृव भट्ट यांची सागरतीरी, तत्त्वमसि व अकूपार ही अनुवाद केलेली तीन पुस्तके फारच सुरेख आहेत. इतकंच नाही तर प्रेरणादायी व मार्गदर्शक जीवनचरित्र मूळ तमीळ लेखक एन. चोक्कन यांनी ‘नारायण मूर्ती : मूल्य जपणारं एक अद्वितीय आयुष्य’ हा ग्रंथ लिहिला असून त्याचा गुजराती अनुवाद अदित्य वासू यांनी केला आहे तर त्याचा मराठी अनुवाद अंजनी नरवणे यांनी केला आहे.

अंजनी नरवणे यांची पुस्तके संपादन :–
अंकरहित शून्याची बेरीज (एकडा वगारना मिंडा या दिनकर जोषी यांच्या गुजराती पुस्तकाचा मराठी अनुवाद); अकूपार (अनुवादित, मूळ गुजराती, लेखक – ध्रुव भट्ट) ; अणसार (कादंबरी, मूळ गुजराती, लेखिका – वर्षा अडलजा) ; अक्षयपात्र (अनुवाद; मूळ गुजराती, लेखिका – बिंदु भट्ट) ; आपण : आपले ताणतणाव – एक चिंतन (स्वतंत्र) ; आय लॉस्ट माय लव्ह इन बगदाद (अनुवादित; मूळ इंग्रजी, लेखक – मायकेल हेस्टिंग्ज) ; इट्‌स नॉट अबाउट द बाइक (अनुवादित; मूळ इंग्रजी, लेखक – लान्स आर्मस्ट्रॉंग व जेनाकिन्स सॅली) ; कथागुर्जरी (गुजराती कथांचा मराठी अनुवाद) ; कुर्यात सदा गोंधळम् (स्वतंत्र) ;
चला ! उठा ! कामाला लागा ! (अनुवादित. मूळ गुजराती, लेखिका – स्वाती लोढा) ; छावणी (अनुवादित, मूळ गुजराती, लेखक – धीरेंद्र मेहता) ; टर्निंग पॉइंट्‌स : आव्हाने पेलत केलेली वाटचाल …(मूळ इंग्रजी. लेखक – ए.पी.जे. अब्दुल कलाम)

टेक् २५ : वेध कलावंतांच्या अंतरंगाचे (अनुवादित, मूळ इंग्रजी, लेखिका – भावना सोमय्या) तत्त्वमसि (दॅट दाऊ आर्ट’चा मराठी अनुवाद; मूळ गुजराती/इंग्रजी, लेखक – ध्रुव भट्ट) डेज आॅफ गोल्ड ॲन्ड सीपिया (अनुवादित कांदंबरी, मूळ इंग्रजी, लेखिका – यास्मिन प्रेमजी) नॉट अ पेनी मोअर नॉट अ लेस (अनुवाद; मूळ इंग्रजी, लेखक – जेफ्री आर्चर) नारायण मूर्ती : मूल्य जपणारं एक अद्वितीय आयुष्य (मूळ इंग्रजी, लेखक – एन. चोक्कन) प्लॅटफॉर्म नंबर ४ (अनुवादित; मूळ गुजराती, लेखिका – हिमांशी शेलत) रामायणातील पात्रवंदना (अनुवादित; मूळ गुजराती, लेखक – दिनकर जोषी) रुचिपालट (स्वतंत्र)
रूसी मोदी : द मॅन हू ऑल्सो मेड स्टील (मूळ इंग्रजी, लेखक – ज्योती सभरवाल व पार्थ मुखर्जी) रेतीचा पक्षी (सहलेखिका – वर्षा अडाळजा) वडवाई (स्वतंत्र) सागरतीरी (’समुद्रांतिके’ या ध्रुव भट्ट यांनी लिहिलेल्या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त गुजराती पुस्तकाचा मराठी अनुवाद) हितगूज : तणावयुगातील तरुण पिढीशी (स्वतंत्र) (संदर्भ – हितगूज).

एखाद्या भाषेत होणाऱ्या सर्जनशील निर्मितीमुळे ती भाषा जिवंत राहते तर अनुवादामुळे ती समृद्ध होते भरभराटीला येते असे म्हटले जाते. परभाषेतून आपल्या भाषेत अनुवादित होऊन आलेली एखादी उत्तम कलाकृती वाचताना याचे प्रत्यंतर आल्यावाचून राहत नाही. अशा या महान लेखिकेला विनम्र अभिवादन.

संगीता कुलकर्णी

— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन:देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Gauri Joshi Sadvilkar on संगीत
आशी नाईक on संगीत
Pratibha Saraph on नकळत
प्रवीण श्रीराम देशमुख on सार्थक करू या जन्माचे
प्रवीण श्रीराम देशमुख on माझी जडणघडण : ३१
प्रवीण श्रीराम देशमुख on माझी “एडिटोरियल अरेस्ट !”