Home बातम्या सिंगापूर : अभिनव ऋतुगंध

सिंगापूर : अभिनव ऋतुगंध

0

परदेशातही आपली संस्कृती, मराठी भाषा जपण्यासाठी महाराष्ट्र मंडळ, सिंगापूर सातत्याने प्रयत्न करीत असते.

मंडळाच्या इतर अनेक उपक्रमांबरोबर ऋतुगंध हे ई द्वैमासिक, सिंगापुरात गेली अनेक वर्षे प्रकाशित होत आहे.‘ऋतुगंध’ लेखक, वाचक यांच्यातील दुवा आहे.

लेखक, वाचक, श्रोते यांना एकत्र आणण्यासाठी नुकताच लेखकांच्या अभिवाचनाचा अभिनव कार्यक्रम फेसबुक वर लाईव्ह केला गेला. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमात ऋतुगंध वसंत या अंकातील निवडक लेखकांनी आपल्या साहित्याचे अभिवाचन केले. यात भारतातून अभिनेत्री, मुलाखतकार-मेघना साने, लेखिका-प्रमोदिनी देशमुख, सिंगापूरहून विवेक वैद्य, उपेंद्र कुलकर्णी, अलका पाठक, ओमप्रकाश अग्रवाल, मोहना कारखानीस तर मलेशियातून प्रशांत सहाणे यांनी अभिवाचन केले. कार्यक्रमाचे निवेदन श्रेयस पेठे यांनी केले. तर तांत्रिक बाबी मोहित कुलकर्णी यांनी सांभाळल्या.

या अभिवाचनाचे वैशिष्ठ्य म्हणजे कथा, कविता, व्यक्तिचित्र, नाटुकली अशा विविध रूपात हे अभिवाचन केले गेले.

यापुढेही असे अनेक अभिवाचनाचे कार्यक्रम आयोजित करण्याचा ऋतुगंध समितीचा विचार आहे.

– टीम एनएसटी. ☎️ +919869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version