म्हणती खरे सुख कशाला
कळेल कां कधी मानवाला
कां जावे वाहून प्रवाहांत
समाजाच्या निष्ठूर नियमांत ?
तोडूनी बंधनाच्या श्रुंखला
घ्यावे जाणूनी खऱ्या आनंदाला
मिळेल कां शैशवाची निरागसता ?
सुटेल कां प्रौढत्वाची कृतीमता ?
झुगारुनी बंधने सारी
मारावी विहंगासम भरारी
उधळावा निर्बंध अश्व चौखूर
करु दे स्वाराला स्वैर संचार
करुनी हर्ष नौकेत विहार
गवसू दे खरा आनंद सागर
तोडूनी पिंजऱ्याचे दार
जाउ उडत दूर दूर
चढूनी भावनेच्या पर्वतावर
मिळेल कां सौख्याचे शिखर ?

– रचना : सौ. मंदा फडणीस, यु. के.