नवी दिल्ली येथील कवयित्री क्षमा प्रफुल यांचे आपल्या न्यूज स्टोरी टुडे परिवारात हार्दिक स्वागत करू या.
आज त्यांची पहिली रचना पुढे सादर करीत आहे.
– संपादक
सुख म्हणजे नक्की काय
सुख म्हणजे
“तू मी” रीपरीपणारा पाऊस आणि अद्रक वाली चाय
सुख म्हणजे नक्की काय
सुख म्हणजे
“तू मी” सरसरणारा सरीचा पाऊस
सुख म्हणजे नक्की काय
सुख म्हणजे
“तू मी” रिमझिमणारा पाऊस आणि मनसोक्त गप्पा
सुख म्हणजे नक्की काय
सुख म्हणजे
“तू मी” कोसळणारा पाऊस आणि कांदे भजी
सुख म्हणजे नक्की काय
सुख म्हणजे
“तू मी’ बरसणारा पाऊस आणि लाँग ड्राईव्ह
सुख म्हणजे नक्की काय
सुख म्हणजे
“तू मी” ओथंबणारा पाऊस आणि सुंदर गोष्टींचं वाचन
सुख म्हणजे नक्की काय
सुख म्हणजे
“तू मी” भिरभिरणारां पाऊस आणि भविष्याचे नियोजन
सुख म्हणजे नक्की काय
सुख म्हणजे
तू मी पाऊस आणि फक्तं आणि फक्तं तू आणि मी

– रचना : क्षमा प्रफुल. नवी दिल्ली
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
