उगवली शुक्रचांदणी पूर्वेला
गेही परतायची घाई निशेला
वेध लागले आता सूर्यदर्शनाचे
प्रेमातुरल्या या मुग्ध उषेला
लाल केशरी रंग उधळीला
निळ्या अंबरी उभी स्वागताला
पाहूनी हे पवन हलवी चवरीला
पक्षी सुरु करती मधुर गायनाला
काही सुचेना कसे सावरु मनाला
नदीच्या पाण्यात डोकावली
स्वतःस निरखे झुळझुळत्या जली
आणि स्व-रुपावर बघा लाजली
दवबिंदुंची रांगोळी हिरवळीवर
हळू पाऊली येईल किरणावली
सुवर्ण पैंजणासाठी थांबली
सूर्यराजाच्या परीस स्पर्शाने तिज शृंगारली
— रचना : विजया केळकर. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
अनेक हार्दिक धन्यवाद