Home बातम्या सुरेखा गावंडे : उत्कृष्ट दिग्दर्शिका

सुरेखा गावंडे : उत्कृष्ट दिग्दर्शिका

2

मनात जिद्द असणार्‍यांच्या पंखात आपोपाप बळ येते. इच्छा तिथे मार्ग सापडतोच. मेहनत व आत्मविश्वासाच्या जोरावर स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाचे बंधन नसते, असा महिलांसाठी संदेश देणारा “ऑक्सिजन फॉर लाईफ” हा लघु चित्रपट लेखिका कवयित्री गीतकार अभिनेत्री व दिग्दर्शिका अशा बहुआयामी व्यक्तिमत्व असणाऱ्या सौ.सुरेखा गावंडे यांनी तयार करून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले आणि पहिल्याच प्रयत्नात उत्कृष्ट महिला दिग्दर्शिका म्हणून पुरस्कार ही पटकावला.

कोल्हापूर येथे कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या स्मरणार्थ भगवान क्रिएशन आयोजित कोल्हापूर मराठी फिल्म फेस्टिवल वर्ष ३ रे यामध्ये एकूण ९२ लघुचित्रपट आणि १८ मराठी चित्रपट स्पर्धेसाठी होते. त्यातून ३२ लघुचित्रपट व ९ चित्रपट स्क्रिनिंगसाठी निवडले.
ऑक्सिजन फॉर लाईफ या लघु चित्रपटासाठी दिग्दर्शन सौ सुरेखा गावंडे व संगीत मिलिंद मोरे असे दोन अवॉर्ड्सची नामांकन मिळाले.

पैकी दिग्दर्शनसाठी अवॉर्ड प्राप्त झालेल्या लघुचित्रपटाचे कथा, पटकथा, गीत, अभिनय आणि दिग्दर्शन या सर्वच गोष्टींसाठी सुरेखा गावंडे यांनी मेहनत घेऊन हा लघुपट तयार केला. त्यांची इच्छा आणि ती पूर्ण करण्याची जिद्द याद्वारे आपल्याला ठळकपणे निदर्शनास येते.

कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज स्मारक भवनात मोठ्या दिमाखात हे अवॉर्ड फंक्शन पार पडले.

दिनांक १३ मार्च२०२३ पासून या महोत्सवाला सुरुवात झाली. १५ मार्च २०२३ रोजी निर्माते संजय लेहरू व मॉडल आणि स्पोर्ट्स बिझनेस वुमन शैलजा डूनुंग यांच्या हस्ते सौ सुरेखा गावंडे यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी अनेक दिग्गज निर्माते आणि दिग्दर्शक, कलाकार तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

2 COMMENTS

  1. सुरेखा मला नेहमीच तुझे कौतुक आणि अभिमान वाटतो तू हे सारे शून्यातून निर्माण केलेस तुझ्या हया गुणाचे किती कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. तू हे सार्थ करून दाखवलेस. अनेक कार्यक्रम तू सहज करतेस तुला सलाम. तुझे यश कीर्ती अशीच वाढो.all the best

  2. व्वा सुरेखा….अनेक क्षेत्रात तुझी भरारी पाहून आम्हा
    सर्व सखींना खुप आनंद होतो…अशीच उंच भरारी घेत
    रहा आणि आम्हाला आनंद देत रहा …
    अभिनंदन….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version