मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या ४९ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेमध्ये, संपादित केलेल्या अंकाची वृत्तपत्र लेखक चळवळीच्या अमृत महोत्सवी सांगता वर्षानिमित्त उत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून, ‘सुवर्णधन’ ची आवाजकार मधुकर पाटकर पारितोषिकासाठी निवड करण्यात आली आहे. दुसऱ्या वर्षीच्या ष्णमासिकाच्या पहिल्या अंकास आवाजकार मधुकर पाटकर यांच्या नावे, सुवर्णधन दिवाळी विशेषांकास गौरविण्यात आले आहे.
धुरु हॉल ट्रस्ट, दादर सार्वजनिक वाचनालय आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान गोरेगाव यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, कामगार नेते दळवी, लेखक नितीन आव्हाड, प्रमुख पाहुणे पत्रकार सचिन परब, ए.आय. चे मार्गदर्शक भानुदास साटम इत्यादी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
स्पर्धेसाठी मुंबई पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच इंदोर, शिकागो, सिंगापूर येथून एकूण १७३ दिवाळी अंक आले होते. यातून सुवर्णधनची निवड करण्यात आली. सुवर्णधनला सन्मानित करणारा हा तिसरा पुरस्कार आहे. प्रथम अंकास स्वदेशी भारत राज्यस्तरीय पुरस्कार, दुसऱ्या वर्षीचा कोकण मराठी साहित्य परिषद, गोवा यांच्याकडून सन्मानित केले आणि हा तिसरा बहुमानाचा पुरस्कार आहे. यावर्षी विषय होता. अभिजात मराठी भाषेची स्थिती गती, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठीची काय स्थिती आहे, समस्या कोणत्या आहेत, त्यावर उपाय योजना कशी व काय करावयाची यांचे संशोधनात्मक असे तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण लेखन आहे. हा अंक मराठी भाषेच्या अभ्यासकांना संदर्भग्रंथ म्हणून मार्गदर्शक व उपयुक्त ग्रंथ ठरतो आहे.
विशेष म्हणजे या विशेषांकात न्यूज स्टोरी टुडे संपादक देवेंद्र भुजबळ यांचा “समाज माध्यमे : मराठी ची स्थिती गति” हा विशेष लेख ही आहे.
सुवर्णधनची संपादक समिती व मार्गदर्शक समिती तसेच लेखक, वाचकांच्या सहकार्यातून सुवर्णधांचा उत्कृष्ट अंक परीक्षकांच्याही पसंतीस उतरला आहे, या बद्दल सुवर्णधन टीमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
🙏रामकृष्णहरी 💐💐💐🚩
बातमी परिपूर्ण कशी होईल याकडे लक्ष असते. आपली बातम्या देण्यासाठीची भूमिका महत्त्वाची आहे…
पोर्टल साठी शुभेच्छा 💐💐💐 💐 💐 💐
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏