सूत्र सुखाचे शोधाया
रात्रंदिन भटकतो
पैसा देई सुख मला
विचारात अडकतो…..१
सूत्र सुखाचे मानवा
सापडेल का कुणाला?
व्यक्तिरुपे ते वेगळे
मन सांगे आपल्याला …..२
प्रेम, दया, क्षमा, शांती
ह्रदयात पाझरते
भाव निर्मळ असता
सुख दिल्याने वाढते….३
वंचितांच्या सेवेसाठी
क्षण श्रमाचे गाळतो
देव तेथेच भेटता
चिंब सुखात भिजतो…४
सूत्र सुखाचे लपले
अंतरात तुझ्या शोध
संत महात्म्यांचे बोल
सकलांनी घ्यावा बोध..५
आयुष्यात सुखासाठी
विकू नये स्वाभिमान
आहे त्यातच शोधावे
सुख, शांती, समाधान…६
— रचना : डॉ दक्षा पंडित. सँनडिआगो, अमेरिका.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800