बालक, तरुण कर्करोग रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू आणणे, त्यांच्या उपचारादरम्यान त्यांना सामान्यपणा आणि आनंदाची भावना प्रदान करणे या उदात्त उद्देशाने नागपूर येथील एचसीजी कॅन्सर सेंटरने डॉ. कमलजीत कौर यांच्या नेतृत्वाखाली 9 ते 19 वर्षे वयोगटातील कर्करोग रुग्णांना मदत करणारी ना-नफा संस्था कॅन्किड्स एनजीओ सोबत (Cankids NGO ) दिवाळी साजरी केली.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना डॉ. कमलजीत कौर म्हणाली की, “या धाडसी तरुण कर्करोग रुग्णांना आमचा पाठिंबा आणि काळजी दर्शविण्यासाठी दिवाळी उत्सव हा एक छोटासा प्रयत्न आहे. आमचा विश्वास आहे की प्रत्येक बालकाला त्याच्या आरोग्याच्या आव्हानांना न जुमानता, हसण्याची आणि जीवनाचा आनंद घेण्याची संधी मिळायला हवी.”
या कार्यक्रमात सर्व मुलांना खेळणी, चॉकलेट्स आणि वह्या पुस्तके व स्टेशनरीचे मोफत वाटप, तसेच एचसीजी (HCG) कर्मचारी आणि कॅन्किड्स गैर शासकीय संस्था (Cankids NGO)चमू यांनी आयोजित केलेल्या संवादात्मक सत्रे आणि उपक्रमांचा समावेश होता.
मान्यवर पाहुणे आणि आयोजकांमध्ये डॉ. अजय मेहता, डॉ. सुचित्रा मेहता, डॉ. मोमिता बेग, डॉ. निधी हरी, आणि संपूर्ण एचसीजी स्टाफ टीम, तसेच कॅनकिड्स एनजीओ नागपूर टीम नेव्हिगेटर कांबळे मॅडम यांचा समावेश होता.
एचसीजी कॅन्सर सेंटरचे सीओओ व्यंकटेश वारलू मारापाका यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाने एचसीजी कॅन्सर सेंटर नागपूरच्या वैद्यकीय उपचारांच्या पलीकडे सर्वसमावेशक कर्करोगाची काळजी देण्याच्या वचनबद्धतेला बळकटी दिली हे निश्चित.
— लेखन : डॉ सुधीर मांग्रुळकर. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800