वीतभर पोटासाठी
किती करावी मरमर
आयुष्याच्या जात्याची ती कायमच घरघर
कधी दिसतच नाही
पूर्ण चांद भाकरीचा
कष्ट करावे कितीक
किती भार जगण्याचा
जिच्यासाठी राबतो मी
तिच रुसून बसली
मागतोय देवाकडे
धान भरून सुपली
देवा दाखव रे दया
पाड पाऊस जोमानं
माझ्या काळ्या आईचे
पूरे होवू दे सपानं
तुझ्या इच्छे पुढे बघ
माझ चालतच नाही
सौदा भाकरीचा केला
बाकी नको मला काही

— रचना : सौ. मेहमूदा शेख. श्रीक्षेत्र देहूगाव, पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
अप्रतिम कविता मेहमूदा