एक कोटी विद्यार्थी व शेतकरी यांना एक लाख कौशल्याशी जोडण्याऱ्या महत्वाकांक्षी “स्किलबुक” चे देशार्पण जगन्नाथ पुरी येथील गोवर्धन मठाचे शंकराचार्य निश्लानंद सरस्वती आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते, नवी दिल्ली येथे उद्या, गुरुवार, ९ डिसेंबर रोजी होत आहे.
“स्किलबुक” हे डिजिटल माध्यम आहे. मोबाईल अप्लिकेशन, संगणक वेबपोर्टल व इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस या तिन्ही माध्यमातून ते उपलब्ध होणार आहे.
“स्किलबुक” या आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास व उद्योजकता उत्पादनाची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे, यावरूनच या प्रकल्पाचे महत्त्व लक्षात येते.
मेक इन इंडिया, मेड इन महाराष्ट्र, स्टार्टअप इंडिया अंतर्गत डीप प्रमाणित स्किलबुक हा भारताचा फेसबुक पेक्षा चारपट मोठा प्रकल्प आहे. यामुळे स्वदेशी मोबाईल अप्लिकेशन, वेब पोर्टल, इलेक्ट्रॉनिक उपकरण व डोंगल होणार उपलब्ध आहे.
“स्किलबुक” : जनक
स्वातंत्रसैनिक कै. देविदास माधव झरकर यांच्या प्रेरणेने त्यांचे नातू, डॉ किरण झरकर यांनी देशसेवेचे व्रत हाती घेतले आहे. त्यांनी सी प्रोग्रामिंग, बीसीसी, रोजगारक्षम कौशल्य यांसारखी अनेक पुस्तके लिहिली आहेत.
डॉ झरकर यांच्या व्हिजन २०२० या शोध प्रबंधाची दखल तत्कालीन राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम यांनी २००३ साली घेतली होती.
महाराष्ट्र शासनाकडून घेतल्या जाणाऱ्या कौशल्य स्पर्धेत झरकर हे राज्यात प्रथम आले आहेत. त्यांनी आयटीआयच्या प्रशिक्षणासाठी मराठी व हिंदीत गाणी सुद्धा लिहिली आहेत. तसेच नजिकच्या काळात त्यांची डिजिटल आयटीआय ही संकल्पना विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे.
डॉ. किरण झरकर हे महाराष्ट्र शासनाच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उस्मानाबाद येथे शिल्प निदेशक आहेत. मानद डॉक्टरेट, पेटंट प्रकाशन, डीप प्रमाणपत्र मिळवणारे आयटीआयचे ते पहिले शिक्षक आहेत.
डाॅ. किरण झरकर हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना त्यांच्या ‘व्यवसाय प्रशिक्षण परियोजना’ ह्या शोधप्रबंधासाठी नवी दिल्ली येथे विश्व मानवाधिकार सुरक्षा आयोगाची मानद डाॅक्टरेट समारंभपूर्वक बहाल करण्यात आली आहे. मानवी हक्क व मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर एकशे ऐंशी देशात तेथील शासनाच्या बरोबरीने जागतिक मानवाधिकार संरक्षण आयोग काम करत आहे. या कार्यशाळेत अनेक देशातील प्रतिनिधींनी तेथील मानवी हक्कांवर आपले विचार मांडले.

देशातील मानवी हक्कांच्या मूल्य वर्धनासाठी संशोधन करून ग्रामीण भागात काम करण्याची गरज आहे. झरकर यांनी शासकीय सेवेत राहून देश कार्याने प्रेरित होऊन केलेले संशोधन मौल्यवान आहे. त्यांचा प्रत्यक्ष खेड्यापासून राजधानी पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे. देशात कौशल्य विकासाचे कार्य पुढे नेण्यासाठी त्यांचे संशोधन नक्कीच उपयोगी पडेल, असे मत आंतरराष्ट्रीय तज्ञ ख्रिटीन बोस यांनी व्यक्त केले आहे .
डाॅ. झरकर यांनी २०१४ साली स्किल इंडिया साठी प्रयत्न करत उस्मानाबाद येथे संशोधन करून आयटीआय मधील विद्यार्थ्यांच्या समस्या व त्यावरील उपाययोजना सांगितल्या होत्या. हा शोध प्रबंध शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या शोध प्रबंधाच्या अंमलबजावणीसाठी विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
या शोध प्रबंधाप्रमाणे केंद्र सरकार कडून सुविधा विद्यार्थ्यांना मिळू लागल्या आहेत.
वेळोवेळी अभ्यासक्रम बदलाबरोबरच संरचना बदल सुद्धा महत्वाचा असतो. राष्ट्रीय व्यवसाय परिषद, नवी दिल्ली अंतर्गत देशातील आयटीआय चालतात. जागतिक कौशल्य स्पर्धेत आपला प्रशिक्षणार्थी अव्वल ठरण्यासाठी कौशल्य विद्यापीठांची आवश्यकता होती. महाराष्ट्र शासनाने देशात सर्वप्रथम जागतिक दर्जाचे कौशल्य विद्यापीठ व सहा सेंटर ऑफ एक्सलन्स केंद्र स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. असे चांगले बदल करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. त्या बद्दल डॉ झरकर आनंद व्यक्त करतात. तसेच राज्यात कौशल्य प्रशिक्षण व उद्योजकता कायदा आणून आयटीआय च्या प्रशिक्षानार्थ्याना दिलासा द्यावा असे त्यांचे आग्रही प्रतिपादन आहे.
देशातील शेतकरी आणि युवकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणारे स्किलबुक निर्माण केल्याबद्दल डॉ झरकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐

– देवेंद्र भुजबळ. 9869484800
देशातील अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी आणि युवा वर्गाचा प्रतिनिधी आणि भारताचे भविष्य असलेला विद्यार्थ्यीवर्ग यांच्या जीवनात क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणणारी जादूची कांडी म्हणजे डाॅ.किरण झरकर यांचा ‘ स्कील बुक ‘ प्रकल्प.याविषयावर मा.देवेंद्र भुजबळ यांचा लेख माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण आहे.अशाच लेखांतून या देशातील परिवर्तनाचे चक्र गतिमान होणार आहे !
– डाॅ.सतीश शिरसाठ.
डॉ किरण झरकर यांच्यावर लीहलेला आपला लेख खुप छान आहे. त्यांच्या कार्याची ओळख अतिशय सुंदर शब्दात आपण करून दिली आहे श्री देवेंद्र भुजबळ सर
डॉ. किरण झरकर यांच्या संशोधन वृत्ती कार्यास मानाचा सलाम ! हुन्नरबाज व्यक्तीच्या प्रेरक कार्याची ओळख, देवेंद्र भुजबळ सरांनी आपल्या पोर्टल वर, स्व: लिखित प्रसारित केली. सर तुमचे खूप खूप आभार ! डॉ. झरकर यांचे मनापासून अभिनंदन !
डॉ.झरकर सरांचे शासकीय सेवेत राहून देशासाठी व मराठवाड्या सारख्या मागास विभागातील विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन चाललेले संशोधन देश व मानवविकासाला नक्कीच उपयोगी ठरेल.
डॉ.झरकर सरांच्या या नेत्रदीपक यशाचा मानाचा सलाम….
संपादक मा.भुजबळ साहेब आपण डॉ. किरण झरकर सर यांच्या कार्याचा आपल्या पोर्टल वर प्रसिद्ध देऊन सन्मान केला. त्या मुळे आजच्या नव संशोधकाची व त्यांच्या कार्याची ओळख आम्हाला झाली. त्या बद्दल आपले हार्दिक हार्दिक आभार.
डिजिटल स्किलबुक मुळे शेतकरी आणि विद्यार्थी यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडून येणार आहे. डिजिटल स्किलबुकचे जनक डॉ. श्री किरण झरकर यांचे त्रिवार अभिनंदन 🌹
तसेच श्री देवेंद्रजी भुजबळ साहेब यांनी सुंदर शब्दांकन केले त्याबद्दल त्यांचे आभार 🙏
फेसबुकपेक्षा चारपट मोठा असा “स्किलबुक” हा प्रकल्प सुरू करून शेतकरी व युवकांच्या जिवनांत आमुलाग्र बदल घडवून आणणाऱ्या डाॅ. झरकर यांचे खुप अभिनंदन व त्यांना या कार्यात भरघोस सुयश मिळो या शुभेच्छां.
डाॅ किरण झरकर ..एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व.
स्किल बुक.. हे संशोधनात्मक कार्य अत्यंत अभिमानास्पद