आज बोलू या आपण थायरॉईड बद्दल. आजकाल हा आजार प्रकर्षाने ब-याच जणींना आहे हे जाणवतं, अर्थात पुरूषांनाही होतो पण कमी प्रमाणात !
मला आठवते एक सुप्रसिद्ध एंडोक्राइनोलॉजिस्ट एकदा त्यांच्या चर्चेमध्ये म्हणाले होते, “देवाने जर मला एक विकार द्यायचा ठरवला तर मला थायरॉईड द्यावा.” यावरूनच अंदाज येतोय आपल्याला की थायरॉईड काही भयानक नाही. सर्वात पाहिली गोष्ट म्हणजे
थायरॉईडचा त्रास होणे म्हणजे काही आजार नव्हे !!
थायरॉईड म्हणजे नक्की काय ?
थायरॉईड आपल्या शरिरात एक लहान ग्रंथी(gland) जी गळ्याच्या खालच्या बाजूला असते. जी हार्मोन (संप्रेरक) तयार करते-थायरॉईड हार्मोन.
थायरॉईड हार्मोन आपल्या शरिराची चयापचन क्रिया संभाळते, लहान मुलांच्या बुद्धीच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाचे असते. शरिराचे तापमान नियंत्रीत ठेवते व हाडांच्या आरोग्यासाठी महत्वाचे कार्य करते.
थायरॉईड ग्रंथीचे काम हे बाळ गर्भात असल्यापासून सुरू होते. म्हणून गरोदरपणात थायरॉईड तपासणी महत्वाची आहे. थायरॉईडचा त्रास विशेषतः महिलांना अधिक होतो. थायरॉइडची समस्या स्त्रियांच्या मासिक पाळीवरही परिणाम करते. वेळेत उपाय न केल्यास गरोदरपणाची क्षमताही कमी होऊ शकते. होईलच असेही नाही !
थायरॉईडचे प्रकार
थायरॉईडमध्ये दोन प्रकार आहेत. १)हायपोथायरॉईड आणि २)हायपरथायरॉईड. सोप्या भाषेत हायपोथायरॉईड म्हणजे रक्तातील थायरॉईड संप्रेरक कमी होणे म्हणजेच रिपोर्ट मध्ये, टी.एस.एच (TSH) वाढणे. सामान्यपणे आपण हायपोथायरॉईड जास्त प्रमाणात बघतो, हायपरच्या तुलनेत !
हायपोथायरॉईड ची लक्षणे :
सहज थकवा लागणे
अचानक वजन वाढणे
सहज थंडी लागणे
केस गळणे
नैराश्य वाटणे किंवा उत्साह कमी होणे
विसरभोळेपणा
मानेच्या खालच्या बाजुला जाड दिसणे/ गाठ दिसणे
हायपरथायरॉईड ची लक्षणे :
उन्हाळ्यात खूप जास्त गरमी होणे,
खूप घाम सुटणे,
हृदयाची धडधड वाढणे,
वजन कमी होणे,
झोप नीट न लागणे,
औषधोपचार :
हा विकार नियमीत एक गोळी घेउन नियंत्रणात आणू शकतो. हो बरोबर वाचलेत- १ गोळी. तुमचे डॅाक्टर आवश्यक ती तपासणी करतील व गोळी सुरु करतील. गोळी रोज सकाळी ऊपाशी पोटी घ्यायची असते. हाच १ सोप्पा ऊपाय आहे एवढ्या या जड शब्द लेखनाचा ! खूपच कमी लोकांना ॲापरेशनची गरज लागते. म्हणजे हा आजार बळावला तर गाठ वाढून तिची शस्त्रक्रिया करावी लागते पण हे क्वचित घडतं.
सकस आहार
आहाराने थायरॉईड विकार बरा होत नाही. पण आहाराने उपायामध्ये साथ नक्की मिळते. वैद्यकीय सल्ला घेऊन औषध चालू करणे महत्वाचे, आणि त्या सोबत आहरा मध्ये थोडे बदले करणे गरजेचे.
काय खावे :
अंडी
चिकन
मासे
भाजी
फळे : – 8केळी, संत्री, टोमॅटो
दुध, दही
कडधान्य
काय खाऊ नये :
कोबी
कॉलीफ्लॉवर
ब्रोकोली
शेंगदाणे
सोयाबीन
रताळी
सारखेचे प्रमाण कमी असावे
मद्य
डीप फ्राय
म्हणजे थारराॕईडला घाबरण्याचे कारण नाही फक्त आपल्या योग्य दिनश्चर्येने आपण आजार नियंञणात नक्की ठेवू शकतो आणि आनंदी आयुष्य जगू शकतो.

– लेखन : डाॕ. प्रशंसा राऊत- दळवी
गायनाॕकाॕलाॕजिस्ट, मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800.
Good information