Friday, October 18, 2024
Homeलेखस्त्री शक्तीचा जागर

स्त्री शक्तीचा जागर

नवरात्रोत्सव असला की स्त्री शक्तीचा सर्वत्र जागर होत असतो. तिच्या भक्तीने, शक्तीने भावनिक वातावरणाची निर्मिती होत असते. देवीपुढे नतमस्तक होऊन नऊ दिवस उपास तापास, पोथी पाट होत असतात. सगळीकडे उत्साही व आनंदी वातावरण असते. तिची उपासना केली जाते. आरती करून भक्ती भावाने, श्रद्धेने पूजा अर्चा केली जाते. देवीचे मंदिर सुशोभित करून देव दर्शनाला येऊन देवीचे आशिर्वाद घेतले जाते.

तसे पाहिले तर प्रत्येक पुरुष, हा स्त्री शक्ती पुढे नतमस्तक होत आला आहे व आज ही होत आहे. तुम्हीच पहा, शक्ती प्राप्त करण्यासाठी दुर्गामातेकडे, ज्ञान प्राप्त करण्यासाठी सरस्वती माते पुढे, धन प्राप्ती साठी महालक्ष्मी माते पुढे, संकट मुक्त होण्यासाठी आनंदी व समाधानी जीवन प्राप्त करण्यासाठी ह्या सर्व शक्तिमान देवीकडे सांगड घातली जाते.
ही तर सर्व स्त्रीची रूपे आहेत !

स्त्री अनेक भूमिका सहज व उत्कृष्ठ निभावते. ती दहा अंगांनी काम करते आणि हो, हे केवळ तिलाच शक्य आहे. जणू हे वरदान जन्मताच तिला प्राप्त झाले आहे.

चाली रिती, परंपरा, सणवार, संस्कृती व संस्कार जपणारी एक स्त्री असते. ती आई, मुलगी, बायको, सून, सासू, नणंद, जाऊ, वहिनी व एक मैत्रीण म्हणून नेहमीच सर्वांशी जोडून असते. ती आपली प्रत्येक नाती जपते, सांभाळते व चोख निभावते. इतकेच नव्हे तर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती काम करतोय. म्हणूनच तिला सुपर वूमन अशी उपमा दिली आहे.

ती अतिशय कणखर असते. नोकरी अथवा व्यवसाय सांभाळून ती स्वतःचे अस्तित्व निर्माण करते. ही तारेवरची कसरत असली तरी ती न दमता, न थकता अगदी रोज आपली कामं, आपली कौटुंबिक जबाबदारी प्रामाणिक पणे निभावते. ती हसतमुखाने, प्रेमाने आपल्या जीवलगांची मनापासून काळजी घेते.

आज असे एकही क्षेत्र नाही जेथे स्त्रीने भरारी घेतली नाही. अथवा आपले वर्चस्व निर्माण केलेले नाही. ती सक्षम आहे, ती कर्तृत्ववान आहे, ती निर्भीड आहे. महिषासुर राक्षसाचा वध करणारी ती देवी एक स्त्री होती.

यमलोकातून आपल्या पतीला आणणारी सावित्री ही स्त्री होती. शिक्षणाचा वारसा चालवणाऱ्या सावित्रीबाई फुले ही एक स्त्रीच होती. युद्धभूमीवर आपल्या बाळाला कवेत घेऊन लढणारी धाडसी राणी लक्ष्मीबाई ही स्त्रीच तर होती. रुग्णाची मनोभावे सेवा करणाऱ्या मदर तेरेसा ही स्त्रीच होती. शिवबाला घडवणाऱ्या जिजाऊ ह्या स्त्रीच होत्या. अशी एक ना अनेक उदाहरणे आहेत. इतिहास साक्षी आहे….. स्त्रीच्या अनेक रूपांना इतिहासाने गौरविले आहे आणि प्रत्येक युगात त्यांना आदर दिला आहे.

स्त्रीने केवळ बाह्य सौंदर्यावर भर न देता आपल्या आंतरिक गुणांचा विकास केला पाहिजे. कारण सौंदर्य ही तर ईश्वराची देणगी आहे, पण आपले अंतरंग आपल्याला नक्कीच सुंदर बनवू शकते. आंतरिक सौंदर्याचा प्रभाव काळानुरूप कायम राहतो.साडी दाग दागिने ह्यातच न अडकता स्वतःचे अस्तित्व निर्माण केले पाहिजे. आत्मनिर्भर झाले पाहिजे.चांगल्या जगाची निर्मिती करण्यासाठी महिला जागृती परम आवश्यक आहे.

जी स्त्री घराला स्वर्ग बनवू शकते, ती विश्वाला देखील स्वर्ग बनवू शकते. ती इतरांसाठी प्रेरणादेखील बनू शकते. जगातल्या मोठमोठे उपक्रम बघितले तर प्रेरणा देणारी ही स्त्रीच कारणीभूत आहे. ताजमहलची निर्मिती होण्यासाठी एक स्त्रीची  (मुमताज) प्रेरणा होती. आज ही अनेक यशस्वी पुरुष आहे जे स्वतः मान्य करतात की त्यांच्या यशात आईचा अथवा बायकोचा हाथ आहे  ‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते’ अशा सारख्या म्हणी त्यामुळेच तयार झाल्या.

प्रत्येक महिलेत कोणता न कोणता विशेष गुण असतो. त्या गुणाला ओळखून, त्याचा विकास साधल्यास स्त्री आपले व्यक्तिमत्व फुलवू शकते. सामान्य स्त्री देखील आसामान्य कामगिरी करू शकते. फक्त गरज आहे ती आत्मविश्वासाने कोणत्याही परिस्थितीत लढण्याची, अशक्य गोष्ट ही शक्य करण्याची. स्वतःला सिद्ध करण्याची.

रश्मी हेडे

– लेखन : रश्मी हेडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on चलो, अमरावती !
वर्षा महेंद्र भाबल on आनंदी जीवनाची गुरुकिल्ली
सौ.मृदुलाराजे on विजयादशमी
सौ.मृदुलाराजे on चलो, अमरावती !
ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था , महाराष्ट्र. on गुरूंच्या आठवणी
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” :  १०
डॉ. प्रशांत भुजबळ on अभिनव टपालदिन