“भायली” म्हणजे “मैत्रीण” हे आमच्या नविन प्रकल्पाचे नाव !!
वर्ल्ड पल्स च्या गृप मधून जुळून आलेले हे भगिनींचे भगिनीसोबतचे एक मजबूत बंध दर्शवते !!
आम्ही छोट्या छोट्या टप्प्यातुन हा प्रकल्प सुरू करायचे ठरविले.
पाळीच्या वेळी वापरण्यात येणारा हा एक शाश्वत व सर्वोत्तम आणि सोपा पर्याय !!
मासिक पाळी दरम्यान कापड वापरणे ही एक जुनी संकल्पना आहे. आमच्या सर्व आज्या, मावशांनी ते पूर्वी पासून वापरले, अगदी आम्ही सुद्धा ते वापरले !!
पण अलीकडे, ते डिझायनर स्वरूपात, नवीन रूपात, नवीन ढंगात दिसू लागले आहेत.
मी २०१७ पासून यावर काम करत आहे, ‘आपणच, आपले स्वत: चे कापडी पॅड, स्वतः साठी बनवणे’ हा अशय सोशल गृप तर्फे राबविण्यात येणारा, माझ्या आवडीचा प्रकल्प !! भारतातील अनेक ठिकाणी रोटरी सारख्या इतर अनेक गटांना जोडणे, मी हळूहळू सातत्याने पुढे जात आहे.
अजमेरच्या ‘अभिचल‘, स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापिका महिमा राठोड, माझ्या सोबत यात जोडल्या गेल्या आणि आम्ही हा प्रकल्प अजमेर आणि जवळपासच्या ठिकाणी एकत्र चालवण्याचा विचार केला.
अभिचल, वेगवेगळ्या प्रकारे मुली आणि स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी मदत करते. शिलाई मशीनवर शिलाई करण्यास मदत करणे हे त्यातील एक आहे. त्यामुळे कापडी पॅड शिवून, सुरुवातीला जवळच्या भागात वितरित करण्याची कल्पना त्यांना या पर्यायाची जाणीव करून देण्याची कल्पना पुढे आली. आणि काम सुरु झाले.
अजमेर गाठणे ही पहिली पायरी होती, मुलींना कापडाचे पॅड कसे शिवायचे, हे शिकवणे दुसऱ्या क्रमांकावर आले आणि काम सुरू झाले. मुलींनी उत्साहाने आमच्याबरोबर काम करायला सुरुवात केली. या कापड पॅडचे वितरण करणे आणि स्त्रियांना ते कसे वापरावे आणि त्याची काळजी कशी घ्यावी हे सांगणे हे सुरुवातीचे लक्ष्य होते.
अजमेरमधील पहिला दिवस मुलींना शिकवण्याचा होता, दुसरा आम्ही एमडीएस विद्यापीठाजवळच्या झोपडपट्टी भागात पोहचलो, येथे महिलांनी कापड पॅड पाहिल्यावर खूप आनंद झाला. त्यांना एकदा वापरलेल्या आणि प्लास्टिक सॅनिटरी पॅडच्या समस्या माहीत होत्या, ज्यामुळे आमच्यासाठी गोष्टी सोप्या झाल्या. येथे आम्ही कापड पॅडचे 20 सेट वाटले.
खारवा साठी दुसऱ्या दिवसाचे नियोजन होते. खारवा किल्ल्याचा स्वतःचा इतिहास आहे आणि आम्हाला तिथे जाण्याचा योग आला. तेथील स्थानिक महिलांना 30 सेट कापड पॅडचे वाटप केले आणि मासिक पाळीच्या या शाश्वत पर्यायाच्या महत्वाविषयी चर्चा केली.
सुरुवात स्वतः पासूनच केली, थोडे तुझे, थोडे माझे… अशय सोशल गृप आणि अभिचल असे एकत्र येऊन, “भायली” या नवीन प्रोजेक्ट मध्ये एकत्र येऊन हा कार्यक्रम सुरू केला. कापडी पॅड शिकविण्याची जबाबदारी माझी आणि ते मुलीं कडून तयार करून घ्यायची जबाबदारी महिमाची !
या मागचा उद्देश इतकाच, की लोकांना ही संकल्पना नीट समजावून सांगावी, त्यामुळे होणारे आरोग्याचे, पर्यावरणाचे तसेच, आर्थिक नुकसान कसे थांबवता येते ते सांगावे.
हळू हळू असेच छोट्या छोट्या गावांमध्ये जाऊन हे असे काम सुरू ठेवणार आहोत. यात काही महिलांना रोजगार ही उपलब्ध होऊ शकतो.
भविष्यात पंख पसरवण्यासाठी आणि जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचण्यासाठी या पर्यायांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी आम्हाला मदतीची आवश्यकता आहे. जे आम्हाला तुम्हा सगळ्यांकडून मिळण्याची आशा आहे.
चला तर मग, एकत्र येऊन थोडी जबाबदारी घेऊन, आपल्या समाजाला स्वच्छतेसोबत आरोग्यपूर्ण, सुरक्षित पर्यावरण सांभाळून, आपल्या पुढच्या पिढीसाठी चांगले पर्यावरण द्यायला थोडा हात भार लावू.

– लेखन : सीमा खंडाळे, प्रवर्तक, “भायली”
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800
Really very good project,it will help to save environment to great extent.I would like to participate whenever possible.
खुप छान & सुंदर कामगिरी