Home लेख स्त्री सन्मान

स्त्री सन्मान

0

चंदा, जरा थांब.
थोडा वेळ बस.
दमली असशील ना ?

रोज चंदा ऑफिसमधून आली की सासुबाई तिला सांगत असत थोडा वेळ बसावं. चहा घे. पाणी घे. खा काहीतरी आणि मग कामाला सुरुवात कर. तिला खरच कौतुक वाटायचं की आपल्याला किती प्रेमाने सांगतात आणि आपल्याला थोडं हायसं वाटतं.

खरंच काळ किती बदलला ना ? ऑफिसमधून आल्यावर हे सांगत असत आणि त्यानुसार तिलाही खूप छान वाटायचं.
पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये निसर्गानेच एक फरक ठेवलेला आहे की पुरुषाला जसं बनवलं तसच स्त्री ला बनवलेले नाही. तिला बाळाला जन्म द्यायचं असतो. पुढे चालवायचे असते. त्याच्यावर संस्कार करायचे असतात आणि म्हणूनच त्यागाचं प्रतीक, थोडसं कठोरपणा चंचलता या गोष्टी स्त्री स्वभावाला दूरच आहेत. वेगवेगळी नाती तिला बहाल करून आपलं कौशल्य नक्कीच सिद्ध करता येतं.

ऑफिस आणि आपली घरातली काम की आपली स्वतःची वैयक्तिक काम आखून दिल्या प्रमाणे ती करत असते आणि घरातली बरीच जण आपल्या वेळेनुसार तिला मदत करत असतात.

मुलगी झाली तरी तिच्या जन्मापासून तिच्या आवडी निवडी जपल्या जातात. पुढे मोठी झाल्यावर ती पण कॉलेजमध्ये जाते. लग्न झाल्यावर ती सून म्हणून प्रत्येकाला आपापल्या शक्तीनुसार, आपापल्या आवडीनुसार वेळेनुसार जपण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे कधीकधी थोडासा हट्टीपणा, थोडीशी चिडचिड, थोडं कौतुक करून घेणं या गोष्टी ओघाने येतातच.

काही घरांमधून असे संवाद आणि अशी वागणूक ही आपल्याला पाहायला मिळते ते एकमेकांच्या आवडीनिवडी जपल्या जातात आणि त्यामुळे नक्कीच त्यांच्या माणसांना त्या ठेऊन घेतात. “एकमेका करू सहाय्य, अवघे धरू सुपंथ” हा मार्ग त्यांनी नक्कीच निवडलेला असतो असं कधीतरी दिसतं आणि ते आदर्शवत असं आहे.
हे सगळीकडे दिसावं अशी सगळ्यांचीच अपेक्षा असते.

हल्लीच्या मुली या तंत्रज्ञान आणि इतर गोष्टी खूपच शिकलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाशी जमेल तसेच जोडून घेण्याचा प्रयत्न करतात. सुखी संसारासाठी हे आवश्यक ही आहे, नाही का ?

मंजिरी कुलकर्णी

– लेखन : मंजिरी कुलकर्णी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version