मध्य प्रदेशातील देवास येथील लेखिका, कवयत्री राधिका इंगळे यांचा “स्थैर्य” हा कथासंग्रह
नागपूरचे सुप्रसिद्ध प्रबोधनकार श्री आशुतोष अडोणी हस्ते प्रकाशित झाला. याप्रसंगी म.प्र.साहित्य संघाचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम सप्रे, सचिव श्री मोहन रेडगावकर, सहसचिव श्री अरविंद खोडके, बृहन्महाराष्ट्र मंडळ दिल्लीचे कार्यवाह श्री दीपक कर्पे, महाराष्ट्र समाज देवास चे न्यास मंडळ अध्यक्ष श्री पद्माकर फडणीस, उपाध्यक्ष श्री दिलीप सुपेकर,मराठा समाज अध्यक्ष श्री प्रकाश देशमुख, उपाध्यक्ष श्री दीपक काळे, समर्थ रामदास विचार मंच देवासचे श्री प्रकाश काळे श्री अशोक कुलकर्णी, देवास चे ख्यात इतिहासकार श्री दिलीप सिंह जाधव सुप्रसिद्ध मूर्तिकार आणि चित्रकार श्री प्रकाश पवार, महाराष्ट्र समाज देवास चे जवळपास १५० सदस्य उपस्थित होते.
श्री पुरुषोत्तम सप्रे यांनी सौ.राधिका इंगळे यांच्या साहित्यिक प्रवासाचा आणि लेखनाचा आढावा घेऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.
श्री आशुतोष अडोणी यांनी याही वयात सतत लेखन सुरू आहे, ही लेखणी अशीच झरत रहावी असे सांगून पुस्तकं वाचून नक्कीच प्रतिक्रिया देईन असं सांगितलं.
अल्प परिचय
सौ.राधिका गोविंद इंगळे (पूर्वाश्रमीच्या पुष्पा अभ्यंकर) देवास, या एम.ए. (अर्थशास्त्र, इंग्रजी. साहित्य )बी. एड. असून ४२ वर्ष शासकीय शिक्षण खात्यात नोकरी करून त्या २०१० मधे सेवानिवृत्त झाल्या.
सध्या त्या प्राचार्य, किंडर हायर सेकंडरी स्कूल, देवास म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे इंग्रजी, हिन्दी, मराठी लेख, कथा, कविता नाटक लेखन विविध मासिकात प्रकाशित होत असते.
याशिवाय त्यांची ९ पुस्तकं प्रकाशित झाली असून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800.