Thursday, June 19, 2025
Homeसाहित्यस्नेहमिलन : बोलक्या प्रतिक्रिया

स्नेहमिलन : बोलक्या प्रतिक्रिया

एमटीएनएल मधून २०२० साली स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या व काही नियत वयोमानानुसार निवृत्त झालेल्या सख्यांचे दुसरे स्नेह मिलन 31जाने 2023 रोजी संपन्न झाले. या स्नेहमिलना विषयीचा वृत्तान्त ही आपल्या पोर्टलवर प्रसिद्ध झाला आहे.

आज वाचू या, काही बोलक्या प्रतिक्रिया….

१) सख्यांनो, आजच्या खास दिवसाची
आपल्या सर्वांना होती ना भेटायची ओढ !
मग सख्यांनो, प्रत्येक सखीच्या कलेला देऊ या
जोरदार टाळ्याची जबरदस्त जोड.

आज स्नेहमिलनाचा आपला सोहळा
करू या साजरा खास निराळा

कॅटवाॅक, स्किट, नाच, गाणी
फॅशन शो, कविता आणि झकास लावणी
चला तर मग फक्त मजा करत
मनसोक्त मनासारखे आज जगायचे
सारे सारे नियम आज तोडायचे.

दिवस आपले हे फुलवायचे
झोपाळ्या वाचून झूलायचे
दिवस आपले हे नटायचे
चेहेर्याला मेकअप नी सजवायचे

वनपीस मॅक्सी छान घालायचे
केसांना स्टाईलनी उडवायचे
हो, मनसोक्त मनासारखे जगायचे
सारे सारे नियम आज तोडायचे

माझं वय किती ?
तुझं वय किती ?
वयाला आज नाही मोजायचे

तू किती बारिक,
मी किती जाड,
अ हं चुकूनही नाही बोलायचे

गुलाबजाम, आईसक्रीम खायचे
जिभेचे सगळे चोचले पूरवायचे.
हो, मनसोक्त मनासारखे जगायचे
सारे सारे नियम आज तोडायचे

हे दुखतंय, ते दुखतंय
अई ग, उई ग
कुणाला किती बी पी ?
कुणाला किती शुगर ?
बिलकुल नाही उच्चारायचे

तुझ्या किती गोळ्या ?
माझ्या अश्या गोळ्या.
आज सर्व सर्वकाही विसरायचे
हो, मनसोक्त मनासारखे जगायचे
सारे सारे नियम आज तोडायचे

पूर्ण वर्ष, संपूर्ण आयुष्य,
आनंदाचं टाॅनिक घेत जगायचे
हो मनसोक्त मनासारखे जगायचे
हो मनसोक्त मनासारखे जगायचे.

आपला स्नेहमिलन MTNL 2023 चा कार्यक्रम शब्दातून प्रत्यक्ष व्यक्त करणे अशक्य आहे इतका हा सोहळा अवर्णनीय, अविस्मरणीय व अप्रतिम झाला. अलका शिवाय अशक्यच अश्या सखीला खास धन्यवाद. सुरेखाने, स्मिताने सर्वानीच आपापल्या परीने कार्यक्रमाला चारचांद लावले.
प्रत्येक सखीचे योगदान आहे.
सर्व सखीने मनसोक्त मजा केली आनंद घेतला.
प्रत्येकीला धन्यवाद. 👍
प्रत्येकीला माझ्याकडून 💐💐

पूर्णिमा शेंडे.

– पूर्णिमा शेंडे. चेंबूर.

२) मला काही छान लिहिता येत नाही. पण तुमच्या सगळ्यांचं कौतुक तर करायचंय. so थोडंसं धाडस करतेय. pls.accept करा.

“स्नेहमिलन” शब्द खऱ्या अर्थाने जगलो आम्ही 31st जानेवारीला. त्यासाठी अलका तुझे मनापासून आभार.
जयाचे anchoring लाजवाब. मानसी, समता, सुप्रिया, जया, लता आणि बाकी सगळ्यांचीच गाणी छानच रंगली.
अलका, वर्षा आणि हीना ह्या तिघींनी तर “appointment day to retirement day” पर्यंत MTNL ची सफरच घडविली. मानसी चे मनोगत भन्नाट. वर्षाने तर कोकण दर्शनच घडविले.
स्मिता आणि सुरेखाच्या नृत्याने तर कार्यक्रमात खरोखरच बहार आणली.
Fashion show मध्ये सगळ्यांनीच भाग घेतल्यामुळे show energetic झाला.
शेवटी DJ वर धिंगाणा घालून तृप्त मनाने, वर्षभराची माहेरची शिदोरी घेऊन घरी गेलो.
सगळ्या मैत्रिणींना मनापासून धन्यवाद.

दमयंती पाटील

– दमयंती पाटील. पनवेल

३) Dear Alka….
DTD 31/01/2023 che snehmilan khup chan👌hote. tu Ani tuzhe team members tumhi keleli mehanat Ani tyala sarva friends ni dileli sath hich ter khari tumhla milale dad ahe🤝Ganesh Vandana suruvat chan friends che speech Ani Kavita khup sunder 👍👍smitacha dance ter apratim once more kela thanks 🙏🏻surekha gawandeni keleli lawani ter khup sunder sarvanche laksha vedhun ghenari sarva friends photos Ani dance madhe gunga hotya he SNEHAMILAN awarnaniya hote keep it up alka💐💐hats off to you🤝👏love you all friends ❤️👏

स्नेहा सावंत

– स्नेहा (छाया) सावंत. नेरूळ

४) MTNL स्नेह मिलन 2023.
आजची पहाट एक वेगळीच Energy घेऊन उगवली. सगळीकडे आनंदी आनंद पसरला आहे. असे वाटत होते कारण एकच आज आम्ही सगळ्या MTNL मधुन VRS आणि Superanuation घेतलेल्या मैत्रीणी एकत्र भेटणार होतो. बेलापूर येथील महेश पार्टी हॉल येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
आमची लाडकी हरहुन्नरी अनेक सन्मानाने पुरस्कृत लेखिका संपादिका प्रकाशिका अशी मैत्रीण अलका भुजबळ हिने न भुतो न भविष्यती अशा कार्यक्रमाचे आयोजन केले होते………. अतिशय नयनरम्य डोळ्याचे पारणे फेडणारा असा हा कार्यक्रम जल्लोषात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वेदनेने झाली. जया रेवणकर हिने अतिशय सुंदर आणि अनोखे सुत्रसंचालन केले. तिला अतिशय सुंदर अशी साथ आमची अजून एक हरहुन्नरी कवियत्री लेखिका जीचे आत्ता च एक 📕 पुस्तक प्रकाशित झाले ती वर्षा भाबल हिने दिली. दिपा, हिना, शुभा रेवाळे यांचीही मोलाची साथ लाभली. डान्स, ड्रामा, फॅशन शो, गाणी कविता वाचन अशा अनेक गोष्टी नी कार्यक्रम ठासून भरला होता. प्रत्येकीचा सहभाग होत. सुरेखा गावंडे हिने अतिशय दिलखेचक ठसकेबाज अशी लावणी सादर केली💃🥰. माझी लाडकी मैत्रीण ज्योत्स्ना सावंत हिने अतिशय सुंदर असे मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर कविता वाचन देखील केले. अलका हिना वर्षा भाबल यांनी MTNL मध्ये लागल्या पासून Retire होईपर्यंत चा प्रवास एका छोट्या नाटिके मध्ये दाखवला. हे पाहून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. अलका ने तर पहिल्या प्रमोशन ची साडी नेसली होती. सगळ्यांचे प्रसन्न चेहरे आणि कार्यक्रमातील उस्फुर्त सहभाग पाहून खूप भारी वाटत होते. फॅशन शो सुरू झाला आणि एकच जल्लोष झाला. केक कापायच्या निमित्ताने सगळ्या च मैत्रीणी स्टेज वर आल्या आणि प्रत्येक गाण्यावर थिरकल्या. आपले वय, देहभान विसरून नाचल्या यातच कार्यक्रमाचे सार्थक झाल्या सारखे वाटले. विमल पाटील हिचे, ‘दिल जलोंका दिल जलाके’ हे 🎤गाणं खरोखर सगळ्या ंचा दिल घेऊन गेले. सुप्रिया सावंत ने, तर चिंचेच्या झाडावरून थेट काश्मीर ला नेले. भाबलांच्या वर्षाने, आमकां कोकणात फिरवून हाडल्यान😁😁. मानसी लाड ने, कसे जगायचे हे सांगितले. नेहमी शांत शांत असणाऱ्या ढोमसे मैडम, चक्क रेशमाच्या रेघांची… साडी नेसून आल्या😁म्हणजे गायल्या. छाया दळवी मैडम, चक्क फुगडी खेळल्या. आमची मैत्रीण, गीता बोरकर हिने देखील स्किट च्या मध्ये डायलॉग बोलुन धमाल आणली. जेव्हा सर्वच जण कार्यक्रमात सगळे सहभागी होतात तो कार्यक्रम यशस्वी झाला असे समजावे. आणि हो या कार्यक्रमात स्मिता लोखंडे हिचा झुमका हरवला आहे कोणाला सापडल्यास जरुर द्यावा😁😁😁. अजून एक सांगायचं म्हणजे, माझी लाडकी मैत्रीण गीता बोरकर हिच्या प्रेमळ आग्रहामुळे खरेतर मी या कार्यक्रमात सहभागी झाले. गीता तुझे शतशः आभार🙏💕 शुभदा, लक्ष्मी, सुरेखा, सीमा, तुमची कमी जाणवली. अलका तुला कोणाचीही दृष्टीने लागु नये कारण कोणाचीही दृष्ट लागावी असा भन्नाट कार्यक्रम तु आयोजित केलास. आमच्या आनंदासाठी तु झटलीस. कष्ट घेतलेस. वेड्या सारखी भान विसरुन सगळ केलेस तुला आणि तुझ्या वेडाला सलाम🙏❤️💐💐🥰🥰🥰🥰🥰🥰

स्मिता लोखंडे.

– स्मिता लोखंडे. ऐरोली

५) Apalya snehmilana baddal jya pritikriya vyakt kelelya mazya maitrini, Smita,
Chaya ,vimal, surekha, jaya, asha….. khoopach sunder lihil ahe ….vachtana khoop Anand hoto…atta phudchya sneh milanachi aturtene vaat baghto……saglya team che khoop khoop abhinandan… khas karun THE GREAT ALKA che….tine pudakar ghetla ani tila saglya maitrini chi saath milali …. karykram successful zaaala.
Parat ekda saglya participants ani ayojakanche abhinandan.
Jaya ch anchoring aprateem.
Surekha ani smitachya dance ne full to dhamal.

गीता बोरकर

– गीता बोरकर, चेंबूर

६) अलका प्रथम तुझे आणि तुझ्या टीमचे खूप खूप अभिनंदन 🙏🏻, ह्या वर्षीच्या स्नेहमिलानाला काय वेगळीच मज्जा आली, तुम्ही arrange केलेल्या कार्यक्रमाचा खूपच आनंद घेतला, आणि भविष्यात आपण असाच आनंद घेत राहू

छाया दळवी

– छाया दळवी, नेरूळ

७) स्नेहमिलन या शब्दातच सगळं काही आलं. अतिशय प्रेमाने आपुलकीने, ओढीने सगळ्या mtnl च्या सख्या एकत्र आल्या. खूप खूप आनंद झाला. असा भास झाला कि आपण ऑफिस मध्येच आहोत. स्टेजवर येऊन प्रत्येकीने आपापल्या कलेचे अतिशय सुंदर सादरीकरण केले. सुरेखा ची ठसकेबाज लावणी तसेच स्मिता ने, नृत्य करून मंत्रमुगद केले. सुप्रिया ची कविता आणि गाणे अप्रतिम, अलका, वर्षा आणि हीना याचे स्किट उत्तमच झाले. जयाचे तर सूत्रसंचालन अप्रतिम 👌. सगळ्याच सख्या छान नाचल्या. अलका, गीता बोरकर, शुभा आणि इतर सख्यांनी खूप मेहनत घेऊन या कार्यक्रमाला यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली. एका वेगळ्याच विश्वात आपण गेलो. असेच दर 31 जानेवारी ला आपण हा स्नेहमीलानाचा कार्यक्रम करूयात आणि आनंदी राहुयात, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते 👍🙏🌹🌹🎂🎂

गीता इंदुरकर

– गीता इंदुरकर. ठाणे

८) जानेवारी 2020 मध्ये आम्ही सर्व सख्यांनी घेतलेली सेवानिवृत्ती. त्यावेळची आमची मनस्थिती आणि आज 3 वर्षांनी जेव्हा आम्ही मागे वळून पाहतो आणि विचार करतो तेव्हा वाटते की VRS आली आम्ही सर्वांनी विचारपूर्वक निर्णय घेऊन ती घेतली म्हणूनच आम्ही सर्वजणी एकत्रितरित्या आजचा हा दिवस एकमेकींच्या सानिध्यात हर्षाने आणि उन्मादाने साजरा करत आहोत, नाहीतर प्रत्येक जण officially retire वेगवेगळ्या दिवशी झाल्या असत्या आणि हे जे Get together 31 जानेवारीला आम्ही एन्जॉय करतो, त्याचे चित्र काही वेगळेच दिसलेच असते.

आजचा हा 31 जानेवारीचा दिवस कधी उजाडतोय आणि आम्ही सर्व एकमेकींना कधी भेटतोय याची प्रत्येकीलाच उत्कंठा लागून राहिली होती. गेला महिनाभर अलकाच्या नेतृत्वाखाली आमची नियोजनाची तयारी जोरात सुरू होती. जसे काही प्रत्येकीच्या घरातीलच हे कार्य आहे अशा भावनेने वेळ काळ विसरून आम्ही सर्वजणी फोनवर तर कधी प्रत्यक्ष भेटून कार्यक्रमाची रूपरेषा आखत होतो.

प्रत्यक्ष जेव्हा तो दिवस उगवला आणि हॉलमध्ये एकेकीचे आगमन होऊ लागले, त्यावेळचा प्रत्येकीच्या चेहऱ्यावरचा आनंद काय वर्णावा ? गणेश वंदनेने जी कार्यक्रमाला सुरुवात झाली, त्यानंतरचे मनोगत, कविता, गाणी, कराओके वरची गाणी, संपूर्ण आमचा MTNL चा प्रवास दाखवणारे स्किट, फॅशन शो, नृत्य आणि शेवटी खास लावणी नृत्याने कार्यक्रमाचा समारोप. अगदी एखाद्या Well organised फंक्शन चे स्वरूपच ह्या सर्वातून दिसत होते.
आणि आमच्या सर्व सख्यांचा उत्साह !!!
त्याचे वर्णन अगदी कल्पनातीत !!!
कोण म्हणेल आम्हाला VRS घेऊन 3 वर्षे पूर्ण झाली आहेत ? कार्यक्रम संपला तरी पाय तिकडेच रेंगाळत होते आणि शेवटी एकमेकींचा निरोप घेतला ते दरवर्षी असेच आजचा दिवस जल्लोषात साजरा करायचा याचे आश्वासन घेऊनच आणि पुढील वर्षभराची ऊर्जेची, प्रसन्नतेची शिदोरी बरोबर घेऊनच.

मानसी लाड.

– मानसी लाड, चेंबूर

९) कविता :  कोकणातली आये

लय वरसान,
गावाक इलो,
खळ्यात चडून,
दारार थाम्ब्लो ।

कमरेत वाकून,
दारात बगल्यान,
भाकरीचो तुकडो,
आंगारसून काढल्यान ।

थरथऱ्या हातान,
माया केल्यान,
कौतुकान झिलाक,
चाकरमानी म्हटल्यान ।

झिलाक बगून,
डोळे भरल्यान,
हळूच पदरान,
हुंदको लपवल्यान ।

पाटच्या दाराक,
न्हावक घातल्यान,
चुलीर पातेल्यात,
चाय टाकल्यान ।

दूधाचो रतीब,
झिलाक लावल्यान,
कनवटीचो आनो,
खुशाल मोडल्यान ।

आंब्याची आडी,
वर-खाली केल्यान,
पीकलेलो रसाळ,
झिलाक खाववल्यान ।

बंदरारच्या सदयाक,
साद घातल्यान,
ताज्या शेतक्याचा,
सार केल्यान ।

आयेच्या मायेत,
म्हयनो सरलो,
मुंबयक जावचो,
दिवस उजाडलो ।

साडयेच्या घडयेत,
पैशे ठेवल्यान,
आयेच्या पायार,
डोक्या टेकल्यान….

नमस्कार मैत्रिणींनो !
३१ जानेवारीची संध्याकाळ, महेश हॉलमध्ये एमटीएनएलच्या जुन्या आठवणींनी मनाला भावूकतेने स्पर्शून गेली. तर नाट्यमय माहोलने हास्याचा आनंद देऊन गेली. माझ्या कवितेतून आपण साऱ्या कोकणातल्या आयेक भेटलो.
फॅशन शो मध्ये साऱ्याच नंबर घेऊन गेल्या.
दरसाल असाच हा दिवस, साऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या सुगंधित गुलाब पाकळ्या फुलत राहोत.
स्नेहमिलन म्हणजे एक टॉनिक व शक्तिमान ऊर्जा होय!

वर्षा भाबल.

– वर्षा भाबल. जुईनगर

१०) Namaskar, Pratham ha progamme achukpane set kelyabaddal Alka Madam che Dhanyavad. Ya karyakramat Karaoke Gani, Kavita, Dance karnyachi Amhala sandhi milali, Ya sathi Amhi khup Abhari Ahot.tasech Revankar Madamche Anchoring Superb,Skit mule june divas athavale. Ha snehamilanacha karyakram Asach vrudhingat hovo hich Ishwar Charani Prarthana🙏🙏💐💐👍🏻👍🏻

विमल पाटील

– विमल पाटील. भांडुप 

११) First I am thankful to God to bless us a job in MTNL Secondly to have good friends like all of you Alka and team has done such a wonderful job to give all of us so much happiness I really thank all from the bottom of my heart who have really worked very hard to make this program so successful 🌹🌹❤️❤️

– दमयंती शर्मा, खारघर

तर अशा या काही बोलक्या प्रतिक्रिया, आपल्याला कशा वाटल्या ? हे अवश्य कळवा…

– संकलन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. प्रतिसाद…वाचता वाचता…अलका पुन्हा हा स्नेहमिलन सोहळ्याचा कार्यक्रम छान आठवणीत ताजा करत आहे.

    • 🤝 पूर्णिमा. सर्वांनी एव्हढ्या भरभरून प्रतिक्रिया दिल्या होत्या त्यातील निवडलं प्रसिद्ध केल्या. खुप एन्जॉय केलं आपण स्नेहमिलन.

  2. Alka….news story madhe saglyanchi pratikriya dilya baddal tuze kiti abhar manave kalat nahi….amchi maitrin aslyacha khoop garv ahe.
    Tuz kautauk kiti kel tari Kami padnar.keep it up Alka, very proud of you….asech tuze kary chalu thev…God bless you.

  3. अतिशय सुंदर प्रतिक्रिया स्नेहमिलन कसे असावे यांचे उत्तम उदाहरण खुप छान सुंदर 💃💃💃💃 अलका ताई 👍 ग्रेट खुप छान 😍👌👌👍👍👍👍

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments