Sunday, June 1, 2025
Homeकला'स्नेहाची रेसिपी' - १७

‘स्नेहाची रेसिपी’ – १७

“लायली लुभान अरेबियन डेझर्ट”

उन्हाळा असो वा कोणताही ऋतू असो, जेवण झाल्यावर गोड, थंड डेझर्ट सर्वांना आवडतेच. आता फक्त आईस्क्रिम, थंड रबडी अशा पुरतेच हे मर्यादीत राहिले नाही तर आपल्याकडे आता देश विदेशातील सुद्धा तऱ्हेतऱ्हेचे नवीन सुंदर डेझर्ट्स बनवली जातात.

असेच एक अत्यंत नावीन्यपूर्ण, आकर्षक अरेबियन देशातील डेझर्ट बनवूया. सर्वांना ते पाहूनच खाण्याचा मोह आवरणे कठीण जाणार आहे. चला मग लगेंच तयारीला लागूया.

साहित्य :
1 वाटी बारीक रवा, दीड वाटी साखर, दीड लिटर दूध, पाऊण वाटी गुलाबपाणी, पाव चमचा व्हॅनिला इसेन्स पाणी, पिस्ते .. बदाम.. काजू यांची जाडसर पूड,1 चमचा वेलदोडे पूड, अर्धी वाटी गुलाब पाकळ्या, जिलेबीचा रंग, अर्धा चमचा तूप, व्हीप्ड क्रीम पावडर 5 चमचे.

कृती :
प्रथम 2 कप दूध फ्रिजमध्ये थंड करण्यास ठेवून बाकीचे दूध आटवून अर्धे करावे. नंतर एका कढईत रवा पाऊण वाटी साखर व दूध एकत्र करून गॅस वर मध्यम आचेवर हे मिश्रण शिजावयास ठेवावे. हे सतत उलथन्याने हलवत राहावे. नाहीतर बुडाला चिकटते व करपते. थोडे घट्ट होत आले की त्यात अर्धी वाटी गुलाब पाणी व 8..10 थेंब व्हॅनिला इसेन्स घालून हलवावे. मग अगदी थोडा जिलेबीचा रंग व वेलदोड्याची पूड घालून गोळा होई पर्यंत सतत आणि एकसारखे परतावे.

एका ताटाला तूप लावून त्यावर हा शिजवलेला गोळा घालून व्यवस्थित पसरावा. थंड होत आला की एका खोलगट भांड्यात 5 चमचे व्हीप्ड क्रीमची पावडर घेऊन त्यामध्ये फ्रिज मधील थंड दुधातील निम्मे दूध घालून इलेक्ट्रीक ब्लेंडरने फेटावे. राहिलेले दूध थोडे थोडे घालत भरपूर हलके होईपर्यंत फेटावे. शिल्लक राहिलेले गुलाबपाणी पण घालुन पांढरे शुभ्र फेसाळ झाले की ते थंड झालेल्या थाळीतील मिश्रणावर एकसारखे पसरवून थर द्यावा. हे फ्रिज़ मध्ये अर्धा तास सेट करण्यास ठेवावे. तोपर्यंत राहिलेल्या साखरेचा एकतारी पाक करून त्यात थोड्या केशर काड्या घालून पाक थंड करण्यास ठेवावा. नंतर फ्रिज़ मधील थाळी बाहेर काढून त्यावर ड्रायफ्रुट्सची पूड व लाल गुलाब पाकळ्यांनी छान सजवून त्याच्या वड्या पाडुन त्याच्यावर ज्यांना जसे गोड लागते आवडते तसा साखरेचा पाक घालून हे थंडगार डेझर्ट सर्व्ह करावे.

वैशिष्टय :
हे अरेबियन डेझर्ट खूप प्रसिद्ध आहे. तिकडे सर्व लोक अतिशय आवडीने खातात. वरून साखरेचा पाक घातल्यामुळे ज्यांना जितके गोड आवडते तेवढे घेता येते. गुलाब पाणी आणि गुलाब पाकळ्या या डेझर्ट साठी आवश्यकच आहेत. त्यामुळे स्वाद तर वाढतोच आणि शोभाही वाढते. व्हीप्ड क्रीम पावडर ऑनलाईन मिळते. हे डेझर्ट मुलांबरोबरच सर्वांनाच खूप आवडेल यात शंकांच नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे हे आदल्या दिवशी बनवुन ठेवले तरी चालते. त्यामुळे गृहिणीना आयत्यावेळी घाई गडबड होत नाही. लहान मोठ्या पार्ट्यांमध्ये हे खूपच रंगत आणेल हे नक्की.

स्नेहा मुसरीफ

— लेखन : सौ. स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माधव गोगावले : कोरेगाव बुद्रुक ते शिकागो !
Shashikant Oak on कथा : २
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on ‘स्नेहाची रेसिपी’ – १७
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनक्रम