Thursday, September 18, 2025
Homeकलास्नेहाची रेसिपी : 20

स्नेहाची रेसिपी : 20

“गोविंद लाडू”

काही जुन्या काळातील पदार्थ आजच्या विदेशी खाद्यपदार्थ जंक फूड, स्ट्रीट फूड, स्टार्टर्स पासून ते डिझार्ट पर्यंत असंख्य पदार्थ जे आरोग्यापेक्षा जिभेसाठीच छान असतात तेच खाण्याच्या नादात मागे पडत चालले आहेत. खरेतर हे घरगुती पारंपारीक पदार्थ खूप पौष्टिक सात्विक असल्यामुळे आरोग्यासाठी खूपच लाभदायक, शक्तीवर्धक, ऊर्जा, बुद्धी वाढवणारे असायचे.

‘गोविंद लाडू’ हा पदार्थ सुद्धा असाच ! पूर्वी हे कायम घरोघरी बनायचे. मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचेच आरोग्य उत्तम रहावे, मुलांना शारीरीक, बौद्धिक वाढीसाठी तर वृद्धाना बलवर्धक असणारे असे हे गोविंद लाडू खाण्यास काहीच अडचण नाही, भूकेच्या वेळी एक लाडू खाल्ला आणि दूध प्यायल्यावर पोट भरणारच. शिवाय इतके टेस्टी, की पुन्हा पुन्हा खाण्याचा मोह आवरता येणारच नाही. पहायचे ना मग..

साहित्य : 2 वाट्या पोहे, 1 वाटी शेंगदाणे, 1वाटी सुक्या खोबऱ्याचा खिस, अर्धी वाटी फुटाणे डाळं, 1 चमचा वेलची पावडर, 1 चमचा खसखस, 2 वाट्या गुळ, 1 वाटी बिया काढलेला खजूर, पाव वाटी साजूक तूप.

कृती : प्रथम शेंगदाणे भाजून साल काढून घ्यावेत. मग गॅसवर कढई ठेवून त्यात पोहे मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजावेत. नंतर त्यात खोबऱ्याचा किस थोडासा परतून घ्यावा. म्हणजे लाडू जास्त दिवस टिकतो. ओलसरपणा असेल तर लवकर संपवावा लागतो. नंतर तो खाली काढून खसखस गरम करावी व किंचित ठेचावी म्हणजे तिचा स्वाद छान येतो. मग थोडेसे तूप घालून खजूर परतावा व खाली काढावा. पुन्हा थोडेसे तूप घालून गुळ घालावा.
तो पातळ झाला की त्यात मिक्सरमधून किंचीत जाडसर फिरवलेला शेंगदाणे, फुटाणे डाळं, पोहे, यांचा भरडा घालावा. आता त्यात खोबऱ्याचा कीस हातानी किंचीत चुरून घालावा व वेलदोड्याची पूड घालावी आणि मग त्याचे पाहिजे त्या आकाराचे लाडु वळावेत. मग थोड्या वेळाने डब्यात भरून ठेवावेत.

वैशिष्ट्य : घरात असलेल्या पदार्थामधूनच कमीतकमी जिन्नसांमधुन जास्तीत जास्त गुणकारी, पौष्टीक पदार्थ बनवण्याचे कौशल्य सुगरणीमध्ये होते. शिवाय झटपट बनणारे, टेस्टी, सर्वांना खाता येण्यासारखे असे पदार्थ बनवण्याचे कसब होते. म्हणूनच हे पूर्वीचे पारंपारीक पदार्थ अजरामर आहेत. आता आपण अधिक पोषणमूल्य वाढवण्यासाठी त्यात मखाणे, डिंक, किंवा ड्रायफ्रुटस् घालून अधिक पौष्टिक लाडु बनवू शकतो. थंडीच्या दिवसात तरी शरीराला स्निग्धता, ऊर्जेची खूप गरज असतेच, पण सध्याच्या धावपळीच्या काळात बाराही महिने यांची सर्वांनाच गरज आहे. शिवाय घाई गडबडीत कधी भूक तर लागते, पण खाण्यासाठी वेळ नसतो. अशावेळी तरी फक्त हा एक लाडू आणि ग्लासभर दूध घेतले की पोट तर भरतेच पण तेलकट, स्पायसी काहीतरी खाऊन पित्ताचा जो त्रास होतो तो नं होता उलट आणखी ऊर्जा मिळते. हे गोविंद लाडु बनवून तर पहा. वेगळे, टेस्टी, सुरेख, हेल्दी असे सर्वगुणसंपन्न लाडू खाऊन सर्वजण नक्कीच खूष होतील.

स्नेहा मुसरीफ

— लेखन : सौ.स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा