Wednesday, September 10, 2025
Homeकलास्नेहाची रेसीपी : २८

स्नेहाची रेसीपी : २८

“वाटल्या डाळीची उसळ”

गणपती बाप्पाच्या उत्सवात, उत्साहात दिवस कसे झरकन निघून जातात, हे लक्षातही येत नाही. आता बाप्पांच्या जाण्याची गडबड ! दररोज त्यांच्या आवडीचे तऱ्हेतऱ्हेचे गोडपदार्थ, मोदक बनवले. आता निरोप देतेवेळी त्यांच्या आवडीची खमंग, चटपटीत अशी वाटल्या डाळीची खास उसळ आपण बनवू या. पण वेगळ्या खास पद्धतीने !

साहित्य :
१ वाटी हरभरा डाळ,सुक्या खोबऱ्याचा किस पाव वाटी, कोथिंबीर, लाल तिखट, मीठ, साखर, लिंबू, आवडीनुसार चवीप्रमाणे कमीजास्त, कढीपत्ता, फोडणीचे साहित्य, तेल, खोवलेला नारळ पाव वाटी.

कृती :
प्रथम हरभऱ्याची डाळ ७-८ तास छान भिजवून घ्यावी. नंतर त्यातील पाणी चाळणीतून काढून प्रेशरकुकर मध्ये ठेवून मोठ्ठया गॅसवर 2 शिट्ट्या काढाव्यात. मग बाहेर काढल्यावर थोडी थंड झाली की मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यावी. कढई मध्ये डावभर तेल घालून मोहरी, जीरे, हिंग, कढीपत्ता, हळद घालून मस्त फोडणी करून त्यात वाटलेली डाळ घालून ती छान परतावी. नंतर त्यात तिखट, मीठ, कोथिंबीर, चवीसाठी 2 चमचे साखर घालून खोबऱ्याचा कीस घालून व्यवस्थित परतून वाफ द्यावी. सर्व्हिंग बाऊलमधे काढून त्यावर ओला नारळ, कोथिंबीर घालून वर लिंबाची फोड ठेवून द्यावी.

वैशिष्ट्य :
डाळ कुकर मधे अर्धवट वाफवून मग मिक्सर मधून वाटून बनवल्यामुळे तेल कमी लागते, लवकर होते आणि ओलसर व नरम होते.खमंग होते. वरून ज्यांना आवडत असेल तर लिंबू पिळावे. लाल तिखट घातल्यामुळे जास्त खमंग होतेच, शिवाय पोटाच्या आरोग्यासाठी पण योग्य असते. हिंग, कढीपत्ता, खोबरे यांचा खूप छान खमंग चव आणि नारळाचाही खास स्वाद खुपच सुरेख येतो. लिंबू आणि साखरेमुळे किंचीत खट्टीमिठी डाळ चटपटीत लागते.
बाप्पा दीड दिवसापासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत प्रथेनुसार प्रत्येकांच्या घरचे विसर्जन करतात. बरेच ठिकाणी गौरीच्या सोबतच यांचे विसर्जन करतात.

गणपतीला आवडणारी ही टेस्टी उसळ दरवर्षी गणपती विसर्जनाला सर्वजण आवर्जून करतात. अशी बनवल्यामुळे ओलसरपणा असल्यामुळे खाताना तोठरे बसत नाहीत. नक्की या पद्धतीने एकदा बनवून तरी पहा. एरवी सुद्धा मधल्यावेळी खाण्यासाठी खूप छान पर्याय आहे.

स्नेहा मुसरीफ

— लेखन : सौ.स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Shashikant Oak on व्यंग कथा
सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा
मितल सुहास वावेकर on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
जयश्री चौधरी मुंबई on व्यंग कथा
सचिन जगन्नाथ कांबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
नामदेव लक्ष्मण वनगुले तळा - सोनसडे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
श्री. समीर मारुती शिर्के on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !