Wednesday, July 2, 2025
Homeबातम्या"स्पर्श" : दृक्श्राव्य दिवाळी अंक

“स्पर्श” : दृक्श्राव्य दिवाळी अंक

मराठी वाचकांसाठी, रसिकांसाठी दिवाळी अंक म्हणजे साहित्याची मेजवानीच. मराठी माणूस दिवाळी अंकाची उत्सुकतेने वाट पहात असतो.

असा हा दिवाळी अंक जर फक्त एका स्पर्शाने तुमच्या समोर साकार होणार असेल तर ? तर मग मराठी माणसाला होणारा आनंद काय वर्णावा ? रेणुका आर्टस् निर्मित स्पर्श दृक्श्राव्य दिवाळी अंकाचे प्रकाशन दिवाळीच्या मुहूर्तावर ऑनलाईन पद्धतीने मान्यवरांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डाॅ. मधुसूदन घाणेकर यांनी असा अंक आपण प्रथमच पहात असल्याचे सांगून साहित्य व कलेला स्पर्शिणारा हृदयस्पर्शी असा हा अंक आहे, असे सांगितले.आपल्या संगीतमय भाषणानंतर त्यांनी शीळवादनाने कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष, ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या चळवळीचे शिल्पकार श्री. विनायक रानडे यांनी हा दिवाळी अंक कसा पहावा व ऐकावा याचे मार्गदर्शन केले. हा अंक कधीही, कुठेही नेता येईल व आनंद घेता येईल असा असून साहित्य व कला यांचा सुंदर संगम आहे, या शब्दांत अंकाचे कौतुक केले.

सहभागी झालेल्या काही साहित्यिकांनी देखील छान मनोगतं मांडली. आपणही या दिवाळी अंकाचे घटक आहोत हे त्यांनी अभिमानाने सांगितले.

प्रकाशन सोहळ्याची सुरूवात रेणुका इंगळे यांच्या सुश्राव्य सरस्वती वंदनेने व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. रेणुका आर्टस्’च्या संचालक आसावरी इंगळे यांनी प्रास्ताविकात स्पर्श या दिवाळी अंकाबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमाताई नागपूरकर यांनी केले. तर रेखा तांबे यांनी आभार प्रदर्शन केले.

स्पर्श : परिचय
स्पर्श चा हा तिसरा दृक्श्राव्य दिवाळी अंक आहे. हा मराठी साहित्य क्षेत्रातील प्रथम ऑडियो- व्हिज्युअल अंक असून यात एका क्लिकवर कथा, लेख, कविता, बालकथा, बालकविता आहेत.विशेष म्हणजे आपण त्या वाचू तर शकतोच पण खुद्द लेखकांच्याच आवाजात ऐकू देखील शकतो ! याशिवाय गायन व सुंदर कलाकृतींनी सजलेले कलाविभाग देखील आहेत!

पुढील लिंकवर क्लिक केल्यास आपल्याला हा अंक वाचता येईल.

येत्या २-३ दिवसात हा अंक बुकगंगावर देखील उपलब्ध होईल. तरी वाचक व रसिकांनी या अंकाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन अंकाच्या संपादिका व प्रकाशिका आसावरी इंगळे यांनी केलं आहे.

अंकाच्या संपादिका व प्रकाशिका आसावरी इंगळे

– टीम एनएसटी. ☎️+919869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४