Tuesday, February 10, 2026
Homeबातम्यास्पृहणीय "संकल्प सेंटर" !

स्पृहणीय “संकल्प सेंटर” !

नालासोपारा येथील संकल्प सेंटर या स्वयंसेवी संस्थेने गेल्या दहा वर्षात दिव्यांग मुलामुलींना उत्तम दिशा दाखविली आहे. आता तर एक विद्यार्थिनी आय ए एस ची तयारी करीत आहे, हे विशेष !

संकल्प सेंटरच्या दहाव्या वर्धापन दिनी चाहत्यांनी नुकताच एक खास कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात वसई, विरार परिसरातील नामवंत डॉक्टर्स, समाज सेवक, तसेच दिव्यांग बालकांचे पालक उपस्थित होते.

या वेळी झालेल्या मनोरंजन कार्यक्रमात अनेक दिव्यांग मुलांनी आपली कला सादर केली. ही कला सादर करताना या मुलामुलींच्या चेहऱ्यावर केवळ आनंदच नव्हे तर प्रचंड आत्मविश्वास दिसून येत होता. आपली कला पेश करताना “हम भी होंगे कामयाब” हा संदेश त्यांनी प्रेक्षकांना दिला.

संस्था परिचय :
जीवन म्हणजे केवळ आपण काय विचार करतो ते नाही, तर आपण कसे जगतो हेही आहे. प्रत्येक व्यक्ती आपापला आनंद वेगवेगळ्या प्रकारे शोधते. प्रत्येक मुलाचा जीवनप्रवास वेगळा असतो. संकल्प सेंटर स्कूल ही मानसिक आव्हाने असलेल्या मुलांना आधार देणारी आणि त्यांना सन्मान व आत्मविश्वासाने जगण्यास मदत करणारी संस्थापी आहे. ही संस्था डॉ. अनिता सिंग यांनी १० वर्षांपूर्वी सुरु केली आहे.

संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

— टीम एन एस टी. ☎️ 98694 84800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments