उंबरठ्याच्या आत
श्वास कोंडलेला.
चार भिंतीत घरात
जीव गुदमरला !…
काढून टाकलेत ते चांदीचे
अडकणारे घट्ट जड जोडवे
बोटांना आवळून ठेवणारे
स्री बंधानाचे गोडवे !
पायातल्या साखळ्या
पावलागणिक रुणुझुणायच्या
अन् किणकिणणार्या बांगड्या
उगा कामात नादायच्या.!
नाही लावत ती ॲलर्जी होणारी
स्टेटस् सांगणारी टिकली..
आंगाबोंगा साडी ऐवजी
सुटसुटीत अंगभर वेषभूषा स्विकारली !
अबलेचे अक्षमतेचे अस्तित्व पुसले
स्वतंत्र स्वच्छंद मुक्त झाले
पराधिनतेच्या सार्या बेड्या तोडल्या
मुक्त पंख गगनात पसरले….!
— रचना : मीना खोंड.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800