Monday, September 15, 2025
Homeबातम्यास्वच्छ महाबळेश्वर सुंदर महाबळेश्वर

स्वच्छ महाबळेश्वर सुंदर महाबळेश्वर

महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद व हिलदारी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ सर्वेक्षण २०२२ भारत सरकार च्या “आजादी का अमृत महोत्सव” अंतर्गत दिनांक २७ सप्टेबर ते ०२ ऑक्टोबर पर्यंत शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यात कचरा अलग करो अमृत दिवस अंतर्गत नागरिकांना कचरा वर्गीकरणाचे प्रात्यक्षिक दाखविणे, शहरातील हॉटेल्स मधील कर्मचारी व पर्यटकांसाठी ‘Bin it to Win It’ या कचरा वर्गीकरणाच्या गेमचे आयोजन, घनकचरा व्यवस्थापना अंतर्गत शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना Waste Intelligence Platform – Digital Waste segregation Monitoring चे लाइव्ह प्रात्यक्षिक दाखविणे, सुक्या कचऱ्यातील घटकांपासून नाविन्यपूर्ण वस्तूंची निर्मिती ‘वेस्ट टू आर्ट’ प्रदर्शन, प्लॉग रन इत्यादी उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.

दि. २७ सप्टेबर २०२१ रोजी ‘कचरा अलग करो अमृत दिवस’ साजरा करण्यात आला. यामध्ये शहरातील रांजणवाडी व गादलवाडी व दिनांक २८ सप्टेबर रोजी गणेश नगर, दत्त हाऊसिंग सोसायटी, जन्नी माता हाऊसिंग सोसायटी या भागांमध्ये जावून घंटागाडीत कचरा टाकायला येणाऱ्या नागरिकांना कचरा वर्गीकरणाचे प्रात्यक्षिके हिलदारी टीम मार्फत दाखवण्यात आली, यात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेवून सकारात्मक प्रतिसाद दिला.

जो निसर्गातून येतो तो ओला कचरा, जो मानवनिर्मित आहे तो सुका कचरा, ज्यामुळे आपल्याला इजा होवू शकते तो घरगुती घातक कचरा व ज्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होवू शकतात तो घरगुती बायोमेडिकल कचरा अश्या प्रकारे सोप्या पद्धतीने कचरा वर्गीकरणाची माहिती सांगण्यात आली. प्रत्येक प्रकारच्या कच-यामध्ये कुठले घटक येतात, संबंधित घटक का वेगळे करायचे याचे महत्व सुद्धा नागरिकांना पटवून देण्यात आले.

सदर उपक्रमासाठी महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांचे मार्गदर्शन मिळत असून नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे , उपनगराध्यक्ष श्री अफजल भाई सुतार, सर्व सन्माननीय नगरसेवक, श्री आबा ढोबळे साहेब , स्वच्छता निरीक्षक श्री बबन जाधव, श्री मनोज चव्हाण, आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी व घंटागाडी कर्मचारी यांचे सहकार्य मिळत आहे.

– टीम एनएसटी, 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments