Sunday, July 6, 2025
Homeसाहित्यस्वजीवनाचे प्रवासी

स्वजीवनाचे प्रवासी

स्वजीवनाचे प्रवासी आम्ही
धरु सुखाची कास
जन्म आमचा उगवतीचा
प्रकाश आमचा ध्यास ॥ १ ॥

रंगबिरंगी पखरण करूनी
करु सुशोभित मातृदिशा
सलज्ज कोवळ्या प्रकाश शलाका
हळुच उजळती दाहीदिशा ॥ २ ॥

प्रकाश न्हाऊनी सारी धरीत्री
हिरवा शालु नेसतसे
चराचराला नवजीवनाचा
वरदहस्त ती ठेवतसे ॥ 3 ॥

दिवसा करूनी प्रकाश पखरण
प्रवास करतो मावळतीकडे
थकुन भागुन बघतो विसावा
गुडुप होईन क्षितिजा पलीकडे ॥ ४ ॥

सवेच माझ्या मनुष्य अन प्राणीही
प्रवास करती घरकुलाकडे
खगही परतती काडी वेचुनी
पिलु ओढीने घरट्याकडे ॥५॥

सुजाता येवले

– रचना : सुजाता येवले.

RELATED ARTICLES

40 COMMENTS

  1. सर्वांना मनःपुर्वक धन्यवाद
    माननीय अशोक साबळे सर🙏🙏

  2. 🌹अप्रतिम कविता 🌹

    धरती माता छान वर्णन केलं आपण.

    चातकासारखी वाट पाहावी लागती
    मृग जल तहानती
    पडीक जमीन आमुची
    सरी बरीस लवकरी.

    🌹अभिनंदन 🌹
    सुजाता येवले

    अशोक साबळे
    Ex. Indian Navy
    अंबरनाथ

  3. सुंदर शब्दांकन केलय..मस्त आवडली कविता.
    मराठी बालभारती मधील कवितांची आठवण झाली 😊

  4. सुरेख काव्य रचना
    मस्त कल्पकता,,,,,.,👍👍👌👌

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments