“हे बघ आमच्या गावी गणपती ला आणि नवरात्रीला जावं लागतं..तिथे नऊवारी साडी नेसावी लागेल..खूप काम करावं लागेल..कळलं ?”
अविनाश ची आई रागाने बोलत होती..ती फक्त मान डोलवत होते.. त्याच अस झालं..
अविनाशने घरी शेवटच सांगितलं, “मी लग्न करीन तर रोमी शी नाहीतर असाच राहीन.”
घरचे खूप संतापले, बरच प्रेशर ही दिलं, तरी तो त्याच्या मतापासून ढळत नाहीए, हे कळल्यावर त्याच्या घरच्यांनी लग्नाला होकार दिला…
एका सुमुहूर्तावर ती रोमी डिसोझा ची रोमी अविनाश साठे झाली..घरात सासू सासरे आणि हे दोघे..अविच्या बहिणीच मालू च लग्न चार वर्षांपूर्वी झालं होतं..तिला एक गोंडस मुलगा होता..वरुण त्यांच नाव..
मालू म्हणजे मालिनी.. तिचंही लव मॅरेज..म्हणून अविनाश ची बायको तरी आपल्या पसंतीची यावी अशी अविच्या आईवडिलांची इच्छा होती..अर्थात त्यात काही चूक आहे, अस रोमीला ही कधीच वाटलं नाही..
तरी देवाच्या मर्जीनेच जोड्या ठरतात, हे त्यांनी समजून घ्यावं अस मालूच म्हणणं होत..
अविनाश ने रोमीची आणि मालू ची आधीच ओळख करून दिली होती..एक दोन वेळा फिरायला, सिनेमाला ही एकत्र गेले होते..दोघींचं छान जुळलं होत..
“आई आत्ता रागात आहे ग..जरा तिला समजून घे.. सगळं छान होईल..” अस मालू लग्नानंतर परत, तिच्या घरी जाताना म्हणाली..
ती गेली आणि थोडं दडपण आलं..रोमी सर्वच सासूबाईंना विचारून करत असे..नाश्ता, जेवण सगळं च.. काही बोलल्या तरी उलट उत्तर द्यायच नाही, हे ही ठरवलं होतं..
तिच्या ह्या स्वभावाने त्या थोड्या शांत झाल्या..
त्यांच्या धाकट्या बहिणीची सून खूप उलट उत्तर द्यायची आणि अजिबात ऐकायची नाही..त्या मानाने ही बरी आहे, आपल्या जातीची नाही एवढंच..दिसायला मात्र देखणी आहे ह..कोणीही प्रेमात पडेल अशीच.. म्हणून तर अवी पडला प्रेमात..नशीब आपलं ..अस त्या सासर्यांना सांगतात अस एकदा अविनाश म्हणाला. अर्थात हे सगळं तिच्या अपरोक्षच..
लग्नानंतर एक महिना ते कुठेच फिरायला म्हणजे हनिमूनला जाऊ शकले न्हवते…अविनाश ला खूप लेक्चर्स होती …
एक महिन्यानंतर काश्मीर ला जायच ठरवलं..अविनाश म्हणाला, “राणीसाहेब..हे पंधरा दिवस, मी आपला गुलाम”
काश्मीर ला गेल्यावर, “ये वादीयाँ, ये फिजाँए बुला रही है तुम्हे” ह्या गाण्याच्या ओळी आठवल्या…
अविनाश, त्याचा सहवास आणि काश्मीर… नुसत्या शरीराने नाही, तर मनाने ही खूप जवळ आले दोघे..
रोमीने न सांगितलेल्या ही बऱ्याच गोष्टी, त्याला सांगितल्या तिने… काय होत्या त्या ?
क्रमशः

– लेखन : प्रतिभा चांदूरकर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
सुंदर कथा..पुढचे भाग वाचण्याची उत्सुकता आहे..