“हँलो, कुठे आहेस darling.. मैत्रीण मिळाली, नवरा विसरली..!” अविनाश तिकडून चेष्टा करत होता..” नाही रे, सकाळी उशिरा जाग आली..! साडेआठ वाजले रे .!” ती अपराधी सुरात..”चिल, बेबी, मी आईला फोन केला होता, ती म्हणालीL, झोपलिए..झोपू दे जरा..! किती नाचवलस तिला..! खरच, शांत आहे ह .. ! आता माझ्यापेक्षा तुझंच कौतुक ! काय करणार ! आलिया भोगासी असावे सादर. !”
“म्हणजे काय ? ” रोमीने विचारलं..!
“ते जाऊ दे..! व्हिडीओ काँल लावू का ? बघतो तरी कशी दिसते तुझी मैत्रीण ..”!
तेवढ्यात मिताली ने फोन खेचला आणि म्हणाली, ” लावा की जीजू..! मलाही बघायचं आहे, किसने मेरे दोस्त का दिलं चुराया “..!
रूमवर गेल्यावर दहा मिनिटं मग अविनाश, मिताली, रोमी ह्याची बडबड सुरू होती..!
मग दोघींनी चहा, नाश्ता केला भरपेट …!
कुठून सुरवात करावी, हेच कळत न्हवत क्षणभर..
मिताली च सांगायला लागली..”मी UK ला गेले ना तेव्हा पहिले दोन महिने एकट, एकट वाटलं ग..! तुझी इतकी सवय..! नंतर ही कित्येकदा तुझं नाव माझ्या तोंडात यायचं.. ! तुझ्यामुळे शिस्त लागली म्हणून कोणावर अवलंबून रहावं लागलं नाही..! मुख्य म्हणजे जेवण..! ते तू मला शिकवलस.. ! कित्येकदा फोनवर रडायचो ग आपण दोघी..! किती कॉन्टॅक्ट मध्ये होत ग आधी ! नंतर कमी झालं ग कामाच्या व्यापात आणि तू लग्न करतेस आणि नोकरी सोडलीस हे ऐकून धक्काच बसला..!
“बर ! आता मला सांग, तुझी एवढी चांगली, मेहनतीने मिळवलेली नोकरी, करिअर सोडून अविनाश शी लग्न केलंस ?”
“अग ! अविनाश विक्रोळी ला आणि मी बेंगलोर ला अस कस राहणार ग ! अविनाश मला म्हणाला, “लग्न झालं की सहा महिने मस्त एन्जोय करू या..! मी असा फिरतीवर असणार..! मग एकमेकांना वेळ तरी कधी देणार ? तुला इथेही सहज नोकरी मिळेल..! खूप कष्ट केले आहेस, स्वतःसाठी थोडे दिवस दे..आणि आपल्या प्रेमासाठी ही..!”“अग ! तू आर्थिक दृष्ट्या स्वाबलंबी आहेस आणि एकदा अश्या स्वावलंबनाची सवय झाली, की दुसऱ्यावर अवलंबून राहणं खूप कठीण..!”
रोमी म्हणाली, “तेवढ सेव्हिंग आहे ग ! इतकी अवलंबून नाहीए मी..! पण मी विचार केला, की अवघी चार वर्षांची असल्यापासून कष्टच करतेय ग..! स्वतःसाठी जग अस आत्ता कोणीतरी म्हणलं आयुष्यात..! तर करू या लाईफ एन्जॉय..!”
“खरच सांगते मितु, अवि भरभरून प्रेम करतो..! त्याचे आईवडील ही मुलीसारखं वागवतात..! प्रेम कधीतरी मिळालं ग आयुष्यात.. ! डँड कधीतरी खुशीत असले, की जवळ घेत..! पण तोंडाला दारूचा वास येत असे..! तेही नकोस वाटायचं..! तुला तर सगळं माहितेय ग..!”
“खरच , सुखात आहे ग मी..! तू ? तुझं सांग..!वाळलेली दिसतेस..! मनात काहीतरी आहे ..!”
काय घडलं असेल मिताली च्या आयुष्यात ?
क्रमशः

– लेखन : प्रतिभा चांदूरकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800