“मामी, मामी” कोणीतरी हाका मारत होत..! रोमीने डोळे उघडले तर समोर वरुण उभा..!
त्याला बघून ती एकदम उठून बसली..! “कधीचा हाका मारतोय मी…!” अस म्हणून त्याने गोबरे गाल फुलवले..!
अरे हा आत कसा आला..! दार तर बंद होतं..!
“मामी” तो परत ओरडला..!
“अरे..! कधी आला माझा सोन्या…!”
हे ऐकून वरुण खुश…! “आत्ताच, just… आलोय मी…!”
ते ऐकून रोमीने त्याला जवळ घेतलं…! तेवढयात मालू आली..!
“काय ग..! दार उघड ठेवून झोपतेस की काय ? अवि नाही तर भीती वाटते वाटत…!”
“नाही ग..! आईबाबा मॉर्निंग वॉक ला जातात ना, एक दोन वेळा किल्ली विसरले होते..! दार बंद असलं की आवाज येत नाही..! म्हणून पहाटे उघडून ठेवते..! मीच विसरते ते ही..!” म्हणत रोमी हसली…!
मालूला दोन दिवस सुट्टी होती आणि मिस्टर बाहेर जाणार होते, म्हणून आली होती..!
दोन दिवस वरुण च्या बोबड्या बोलांनी घर आनंदून गेलं होतं..! आजी आजोबा नातवंडांशी खेळता खेळता स्वतः ही लहान झाले..!
किती छोटया छोट्या गोष्टीत आनंद लपला आहे हे कळण्यासाठी तरी लहान मुलांशी भरपूर खेळावं..!
रोमी आणि वरुण लपालपी खेळताना, वरुण लपलाय म्हणत स्वतःच हात लावायचा आणि कोण हात लावतय …अस म्हणून तिने नाटक केलं तर खळखळून हसणार…!
त्याला “आई मला खेळायला जायचंय, जाऊ दे ना व” हे गाणं खूप आवडायचं, त्यावर डान्स, ऍक्शन बघण म्हणजे निव्वळ मनोरंजन..! कुठलंही चॅनेल, सिरीज त्यापुढे अगदी फिक्की..!
लहान मुल घरात म्हणजे अपार आनंद…!
ते दोघे गेले आणि घर सूनसून वाटायला लागलं..!
सकाळी दहा वाजता बेल वाजली घराची, दार उघडलं, तर समोर मिताली…!
“Surprise”….अस म्हणत…!
“ये..ये..!” अस म्हणत रोमीने तिचा हात धरला..!
ती सोफ्यावर बसली…! आईबाबांशी ओळख करून दिली रोमीने..!
“अग..! इथेच रहायला यायचं ना..! मोठ्ठ घर आहे चांगलं..! अविनाश ही नाहीए..!” रोमीच्या सासूबाई म्हणाल्या…!
“next time.. नक्की..” मिताली म्हणाली..!
चहा, ब्रेकफास्ट झाला…!
जेवण बनवण्यासाठी मिताली ने मदत केली…!
त्यांना जुने दिवस आठवले तेव्हा..! तिच्या सासूबाई ही त्यांच्या गप्पांत सामील झाल्या..!
सर्व तयारी करून दोघी रोमीच्या बेडरूममध्ये गेल्या..!
तिने लग्नाचा अल्बम दाखवला..! तो दाखवताना लग्नातल्या गमतीजमती ही सांगत होती..! दोघी हसत होत्या..! तुला खूप मिस केलं अस रोमी म्हणत होती..! तिचा मूड बघून, रोमीने हळूच विचारलं, “समीर चा फोटो दाखव ना pl..!” मिताली ने क्षणभर तिच्याकडे पाहिलं आणि मोबाईल मधले दोघांचे फोटो दाखवले..!
डिसेंट वाटत होता फोटोवरून..! फोटो दाखवताना तिच्या चेहऱ्यावर हसू होत..!
सासूबाईंनी आवाज दिला, “चला ग जेवायला..! जेवण झाली..! आणि सगळं आवरून दोघी टेरेस गार्डन मध्ये गेल्या..! बिल्डिंग च्या टॉप ला गार्डन होती..! आकाशाच्या जवळ भासणारी..! एकदम मस्त..! दोन्ही बाजूला झाडं, मधून पायवाट केलेली, वॉक साठी…कोपऱ्यात झोपाळे, त्यावर डेकोरेटेड रुफ, बसायला बेंच..!
बघूनच तिथून हलावस वाटणार नाही..! इतकी मस्त..!
दोघी झोपाळ्यावर बसल्या…!
“मस्तच आहे ग गार्डन..! ” मिताली म्हणाली..!
“हो..ग..मी येते इथे बरेचदा…! आईबाबा आणि मी, अविनाश असेही येतो फिरायला..! एकदम फ्रेश वाटत..!”
“तुला एक विचारू” ” रोमी ने विचारलं…!
“एक काय दहा विचार..! मिताली हसत…!
रोमी शब्दांची जुळवाजुळव करायला लागली..!
क्रमशः

– रचना : प्रतिभा चांदूरकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800