रागारागाने आईंनी फोन आपटला..! रोमी आणि सासरे त्यांच्या कडे बघायला लागले..!
“कितीदा सांगितलं, वरुण ने हट्ट केला तरी त्याला आइस्क्रीम देऊ नकोस..! त्याला आला ताप परत..! आजकालच्या मुलींना मुलांच लक्ष कस डायव्हर्ट करायचं, तेच येत नाही..! आम्ही लागलीच काहीतरी सांगून, दुसरीकडे लक्ष वळवायचो..!”
“आपोआप विसरायचे..! टॅक्ट असते ती..!”
“ह..रोमी हे तुलाही ऐकावं लागेल ह..” सासरे हसून म्हणाले..! रोमी लाजत हसली..! आईंना लहान मुलांची खूप आवड होती..! बिल्डिंग मधल्या सर्व छोट्या दोस्तांशी मैत्री होती त्यांची..! कित्येक वेळा त्यांच्याकडे मुलं सोपवून बिल्डिंग मधल्या आया तास दोन तास काम करून येत..! सासरे त्याला मोफत बेबी सिटिंग अस गमतीने म्हणायचे, सासूबाईंना चिडवायला, तरी त्यांनाही खूप आवडायचा ते..! लहान मुलांची किलबिल, त्यांची निरागसता, बघून आपल्याला कळत की आपण आपली मूळ वृत्ती केव्हाच सोडलीय..!
“अग..! होमिओपॅथी च औषध देईल ती वरुण ला, लागलीच बरा होईल तो..! तू काळजी करू नकोस..” अस बाबा म्हणाले..!
तेव्हा आई थोड्या शांत झाल्या..!
तेवढयात फोन वाजला..! नंबर तर अननोन होता..! कोणाचा असेल असा विचार करून रोमी ने फोन उचलला, “हँलो..” म्हणत..!
“हाय…मी समीर..मितालीचा to be..”
ते ऐकून रोमी उडालीच एकदम…! सावरत “हाय..! कसे आहात ?” वगैरे बोलू लागली..!
“मी उद्या मुंबईत येतोय..! मितालीला सांगू नका..! Surprize देतोय… हॉटेलचा पत्ता विचारायला आणि ही बातमी द्यायला फोन केला..”
“हो..हो..पाठवते व्हाट्स अप वर..! हाच नंबर ना..” रोमी आनंदात, आश्चर्यात बोलली..!
“हो.. ok..! bye.. ! see you..!”
“Oh..yes.. नक्कीच..”
रोमीला खूप आनंद झाला..! हे नक्कीच अविच काम..! Great… My love..! Miss you..!
तेवढ्यात त्याचा फोन आला..!
“मुझे याद कर रही हो..!” खुशीत असला की हिंदीत बोलण ही त्याची सवय…”
“yes.. खूपच..! तुझे किती आणि कसे आभार मानू..! मी नक्कीच काहीतरी good deeds केलीय, म्हणून तू माझ्या आयुष्यात आलास..” रोमी ने भरलेल्या आवाजात म्हटल…!
“तेरे लिए ये कुछ भी नही डार्लिंग..! छोटीसी बात है..! अविनाश म्हणाला..!
“पण आता तुझा विरह सहन होत नाहीए हं अजिबात..! दिलं का आलम मै क्या बताउ तुम्हे..! वो दिलं में है फिर भी मिल नही पाऊ उसे..”!
रोमी खळखळून हसत म्हणाली, “तू ना ह्या लेक्चर्स बरोबर हिंदी सॉंग ही लिही..छान जमेल तुला..”
“हसीना की इस हसी ने तो पागल किया मुझे..!”
“येते लवकर..! मला तरी कुठे करमतय..!”
अस म्हणत बोलणं थांबल…
आपल्याला मदत करताना, अविनाशच्या दिलखुलास स्वभावामुळे कितीदा खळखळून हसायचो आपण..! आणि तो अनिमिष नजरेने पहायचा..!
ती मदत गरजेची होती…!
क्रमशः

– लेखन : प्रतिभा चांदूरकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800