Saturday, July 12, 2025
Homeसाहित्य'स्वप्नरंग स्वप्नीच्या' ( २१ )

‘स्वप्नरंग स्वप्नीच्या’ ( २१ )

मॅनेजमेंट समोर अविनाश आणि युनियन लीडर एकनाथ दोघे बसले होते..!
एकनाथ ने सांगायला सुरुवात केली..! “रोमी मॅडम ने खूप मेहनत करून प्रोडक्शन वाढवल होत..!
कॉम्प्युटर मधले सर्व रेकॉर्ड आमच्या दोघांकडे होते..! त्यांनी बरेच बदल केले कामात आणि त्यासाठी माझी मदत घेतली होती..!
भोळेपणाने ह्या फाईल चा पासवर्ड ही सांगितला होता एकदा कामाच्या उत्साहात..! मी तो लक्षात ठेवला..! डेटा लॉक करून पासवर्ड बदलला..! रोहन साहेबांनी सर्व सांगितलं कस करायचं ते..!
मॅडमना कळलंच नाही शेवटपर्यंत, त्या रोहन ला चांगला मित्र मानत होत्या..!
रोहन सरांनी मला पैसे आणि थोडे परसेंट त्यांना मिळणार त्यातले, अस दोन्ही कबूल केलं..! मी ही मोहात पडलो..! मिळतंय तर कशाला सोडा म्हणून..!”

ही गोष्ट कंपनीत जास्त फैलावू नये म्हणून एकनाथला दम देऊन सोडून दिलं..! रोहन ची बदली केली दुसरीकडे..! तरीही सर्वांच्या कानावर गेल्याच त्या..! कंपनीला अशी भीती की असच आणखी कोणीतरी करेल..! म्हणून ह्या सर्वांवर देखरेख करण्याची जबाबदारी वाढली..!

कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी जरी काही करायला गेलं, तरी असे त्रास देणारे कर्मचारी असतातच..!
रोमीला न्याय मिळाला, जे ती प्रामाणिकपणे डीझर्व करत होती ते ही मिळालं..!
त्याआधी तिच्या आणि अविनाशच्या सात, आठ भेटी झाल्या..! प्रत्येक भेटीत तो तिला काही विचारत असायचा आणि ती उत्तर द्यायची..!

कित्येकदा तिच्या सीध्या, साध्या उत्तरावर तो चिडायचा..! खोचकपणे बोलायचा..! ती मात्र चेहरा पाडून बोलायची मग..! तो रोहनवर संशय घ्यायचा, तेव्हा ती म्हणायची तो माझा बेस्ट फ्रेंड आहे..! तो नाही अस करणार…!
ते ऐकून अविनाश मुठी आवळायचा…! त्याला रागाने टेबलावर हात आपटायची फार सवय होती, पण ती ही त्याला आवरती घ्यावी लागायची..! तिच्या निरागस चेहऱ्यामुळे…!

रोहन ची बदमाशी त्याला कळलेली होती..!
खुद्द मॅनेजमेंट च्या तोंडून, कुठेही डीसक्लोज करायची नाही ह्या अटीवर, तिला सांगितली गेली, तेव्हा ती दगडासारखी भावनारहीत होऊन एक दोन मिनिटं, तशीच बसून राहिली होती..!
अविनाश ने तिला भानावर आणल..!
नकळत तिने त्याला मिठी मारली आनंदाने केबिनमध्ये आणि दोघांना जाणवलं, की ते एकमेकांच्या प्रेमात पडलेत..!

एक दिवस अविनाश ने तिला डिनर ची ऑफर दिली..!
तिने अर्थात स्वीकारली..!
अविनाश खूप अवस्थ वाटत होता..! तिने विचारलं काय झालं, काय होतंय..! तर काही नाही अस म्हणाला..!
जेवण झालं, तो तिला टॅक्सीत बसवायला गेला..! ती टॅक्सीत बसणार, तेवढ्यात तो म्हणाला, “I love you ..! will you marry me ?”
घाम फुटला होता त्याला, तेवढही बोलताना..! एव्हढा to the point बोलणारा, डायरेक्ट मुद्यावर येणारा, त्याची ही अवस्था बघून रोमीला हसायला येत होतं…!
“yes” अस रोमी म्हणाली आणि त्याने टॅक्सीतून तिला जवळजवळ बाहेर खेचलंच..!
तो टॅक्सीवाला ही बघायला लागला…! त्याला वाटलं हा जबरदस्ती करतोय..! तो रोमीला म्हणत होता, घाबरू नका वगैरे..! रोमीला खूप हसायला येत होतं आणि अविनाश चिडला होता..! रोमी ने त्या टॅक्सीवाल्याला समजावलं मग तो वाद घालायला लागला..! पैसे बुडाले करून..!
अविनाश ने त्याला पैसे दिले..!
तिथेच जवळपास असलेल्या एका बेंचवर बसून अवि म्हणाला, “तू नाही म्हणलीस तर, ह्याच प्रचंड टेन्शन आलं होतं..”
रोमीला हसायला आलं..! एवढया कॉन्फिडन्स ने लेक्चर देणारा, इतका घाबरला होता..!
“तुला खरच सांगतो, आयुष्यात नकार ऐकायची मला सवय नाही..आणि मी म्हणून कोणाच्या प्रेमात पडायचं नाही अस ठरवलं होतं..! तुला पाहिलं आणि वाट लागली..! दिवसरात्र तूच दिसायचीस ग..!”
“तू काय माझी फजिती बघत होतीस, त्या टॅक्सी वाल्यासमोर..! Bad girl..!”
रोमी म्हणाली, “नाही रे..! मी तुझ्या कधी प्रेमात पडले, ते मलाही कळलं नाही..! एवढा कॉन्फिडन्स असलेला तू, तुझी अवस्था अशी होईल अस वाटलं न्हवत..”
“इतकं सोप्प नसत ग, प्रपोज करणं, शहाणे..” अस म्हणत आसपास बघत तिला हळूच जवळ ओढल..!
रोमी म्हणाली, “तुझ्या आईबाबांच काय ? ते विरोध करणार रे..! मी कॅथलिक, तू ब्राह्मण..”
“हो ..! करतीलच..!” तरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे तू कॅथलिक असून व्हेजिटेरिअन आहेस आणि ब्राम्हण असून नॉन व्हेज खाणारा..”
मागच्या जन्मीची ब्राह्मण असावीस…” अवि म्हणाला…!
“टेन्शन आलंय..” ती म्हणाली..!
“मै हु ना..! ” तो म्हणाला..!
“आत्ता पाहिलं ह..! आँखो देखा हाल ..!”
“इतकं काही चिडवायला नको ह..! आई बाबा विरोध करतील ही खात्री आहे..!
पण मी त्यांना समजावीन..!
तसच झालं..! आईबाबा खूप चिडले..!
तरी लग्न झालं..! आणि आनंदाने..!
क्रमशः

प्रतिभा चांदूरकर

– लेखन : प्रतिभा चांदूरकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments