रोमी आणि अविनाश फोन लावत होते जवळपास आठ तासापासून..! रुचीचा फोन कव्हरेज एरिया च्या बाहेर आहे असाच मेसेज येत होता..!
नेहमीसारखी कॉलेजमध्ये गेलेली रुची, रात्रीचे दहा वाजले तरी घरी आली न्हवती..!
कॉलेजच्या आणि इतर मित्र, मैत्रिणी, सर्वांना फोन लावून झाला होता..! बारा वाजेपर्यंत ती कॉलेजमध्ये होती..!
नंतर घरी जाते म्हणून गेली..!
कुठे गेली, कोणालाच माहीत नाही…!
अविनाश आणि रोमी घाबरले..! अविनाश ने त्याच्या एका पोलिस मित्राला फोन केला..! तो म्हणाला, मी घरी येतो..! घरी येऊन रुची ची खोली तपासली..! तर एका ड्रॉवर मध्ये लपवून ठेवलेली कुराणाची छोटी प्रत, मशिदीचे फोटो आणि एक ग्रुप फोटो सापडला..! त्यातली एक मैत्रीण रोमीच्या ओळखीची होती..! एक दोनदा घरी आली होती..। फोन नंबर ही होता..। तिच नाव श्वेता होत..! तिला फोन लावला..!
तिने सॅम चा नंबर दिला..! पण सॅमचा नंबर नॉट रीचेबल येत होता..! बोलता बोलता, ती म्हणाली सॅम आणि रुची बेस्ट फ्रेंड आहेत…! ते फिरत असतात बऱ्याच वेळा..! कुठेतरी गेले असतील, मोबाईल ला रेंज नसेल…!
सॅमच नाव रुचीकडून कधीच ऐकलं न्हवत..!
अविनाश च्या पोलीस मित्राने ताबडतोब त्या नंबर चे डिटेल्स काढले…!
त्याचा संशय खरा ठरला..! ही केस लव जिहाद चीच होती..! आजकालच्या मुलांमध्ये जातीयवाद अजिबात नसतो..! ते हा जातीयवाद मैत्रीत आणतही नाहीत…! पण त्याचा फायदा घेणाऱ्यांचं काय ?
रुची त्या जाळ्यात अडकली..! प्रत्यक्षात सॅम च खर नाव इक्बाल कुरेशी होत…! त्याने रुचीला त्याच्या कह्यात घेतलं होतं..!
म्हणूनच कोणालाही घरात काही कळलं नाही..!
अविनाश ने त्याच्या ओळखीच्या पक्षातल्या मोठया नेत्याला फोन केला..! ही मदत घेणं भागच होत..! त्याने त्याच नाव न सांगण्याच्या बोलीवर मदत करायची कबूल केली…!
त्या अड्ड्यावर पोलीस पोचले…! सॅमला आणि रुचीला ताब्यात घेतलं..!
सुदैवाने फार लवकर हालचाल झाली आणि रुची वाचली..!
सॅमला ताब्यात घेतल्यावर फार मोठं रॅकेट मिळालं…!
रुची..! तिला फार मोठा मानसिक धक्का बसला..!
तसाच अविनाश, रोमी, विहान आणि घरच्यांना ही..!
दोन वर्षे काहीही सेलिब्रेशन केलं न्हवत..! कशात ही मन लागत न्हवत..!
रुचीला ह्यातून बाहेर काढण्यासाठी काय काय करावं लागलं…?
क्रमशः

– लेखन : प्रतिभा चांदूरकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800