“मी तुझ्याशी लग्न करण्याचा निश्चय केला अस तुझ्या रिटा मावशीला कळलं आणि तिने कोणाकडून तरी नंबर घेतला माझा आणि मला भेटायला घरी याल का ?” अशी विनंती केली..
“अरे, तिच तर म्हणाली की इतक्यात सांगू नकोस… इतक्या दिवसांनी थोड सुख तुझ्या वाटेला येतेय..नंतर सांग सगळं..तो समजून घेईल” रोमी धाडधाड बोलली..
“अग ! हो हो ! रिटा मावशीला वाटलं की लग्नाआधीच खरं सांगितलं तर बरं.. उगाच तिचं आणि तुझं मन तुला खात राहील..”
“इतके दिवस मी स्वतःला अपराधीच समजत होते रे..किती ब्लेम केलंय स्वतःला मी” बोलताना रोमीच्या डोळ्यात पाणी होत..
“I know dear ! आधीच तू इतकं सोसलं आहेस, परत परत तो विषय कशाला ? म्हणून बोललो नाही ग..”
तुझ्या रिटामावशी ने सगळं सांगितलं, की “तुझ्या डॅड ला दुसरं लग्न करायचं होतं..त्यासाठी तुझी ममा डीव्होर्स देत न्हवती..मग त्यांनी तिला टॉर्चर करून ती मानसिक रुग्ण आहे हे सिद्ध करून त्या हॉस्पिटलमध्ये टाकली..एवढंच नाही रिटा मावशीने माझ्या आईवडीलांना ही सगळं सांगितलं, की तू कसा आणि किती त्रास भोगला आहेस ते..ती म्हणाली, “पोरीला फक्त प्रेम द्या, बघा कितीही कष्ट करेल, तुम्हाला सुखातठेवण्यासाठी.”
मलाही म्हणाली,
“पोरगी खूप गुणी आहे रे, तू लग्न केलंस तर सगळ्या त्रासातून सुटेल…माझा काही भरवसा नाही आता.. जेनीची, रोमीच्या आईची तब्बेत तर अशी आहे, की ती कधीही जाईल..जेमतेम चार वर्षे ही आईच सुख लाभलं नाही रे पोरीला..खूप सहनशील आहे पोर”
सगळं ऐकून रोमी एकदम स्तब्ध झाली..अविनाश ने तिला जवळ घेतलं, तेव्हा खूप रडली..
खूप वेळ तो, थोपटत होता तिला..
हनीमूनहुन घरी आलेली रोमी कुणीतरी वेगळीच होती…सुखाचं तेज चेहऱ्यावर आलं होतं..
ते तसच राहणार होत का ? येणारा काळच सांगणार होता..
क्रमशः

– लेखन : प्रतिभा चांदूरकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800